पुणे : – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांना खोकला आणि छातीत कफ झाल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. पाच दिवसांच्या उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याने आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
रुग्णालयात सहाव्या दिवशी सकाळी शरद पवार व्हीलचेअरवर बसून बाहेर आले.
रुग्णालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्ते आणि समर्थकांकडे पाहून त्यांनी हात उंचावून अभिवादन केले. त्यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अभिवादन स्वीकारल्यानंतर ते गाडीत बसून पुण्यातील मोदीबाग येथील निवासस्थानी रवाना झाले.रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना सांगितले की, शरद पवार यांच्या छातीत संसर्ग झाला होता. त्यावर योग्य वेळी अँटीबायोटिक्स उपचार सुरू करण्यात आले आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत गेली.डॉक्टरांच्या मते, सध्या त्यांची तब्येत स्थिर असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र पुढील तीन ते चार दिवस त्यांनी पूर्ण विश्रांती घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय पथकाने दिला आहे.त्यानंतर ते प्रवास करू शकतील, असेही स्पष्ट करण्यात आले.डिस्चार्जनंतर शरद पवार मोदीबाग येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. तेथे पुढील काही दिवस ते विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.दरम्यान, पवार यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर विविध राजकीय नेत्यांनी आणि समर्थकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. आता ते उपचारानंतर घरी परतल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतची चिंता दूर झाली आहे.
उपचारानंतर शरद पवार घरी परतले!
डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
44.1
°
C
44.1
°
44.1
°
10 %
3.1kmh
0 %
Tue
44
°
Wed
45
°
Thu
45
°
Fri
44
°
Sat
46
°


