33.1 C
New Delhi
Wednesday, May 20, 2026
HomeTop Five Newsधामणीला महादेव मंदिरात रुद्राभिषेक

धामणीला महादेव मंदिरात रुद्राभिषेक

मंचर: आंबेगांव तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी येथील पेठेतील पुरातन श्री महादेव मंदिरात महाशिवरात्री सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.पहाटे श्री महादेवाचा महारुद्राभिषेक व आरती झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले यावेळी महिला भाविकांची संख्या मोठी होती त्यानंतर सकाळी दहा वाजता ह.भ.प.गणेश महाराज लव्हारे आळंदीकर यांचे किर्तन झाले किर्तनाला भाविकांची गर्दी होती.त्यानंतर भाविकांना केळी व खिचडीचा प्रसाद वाटण्यात आला यावेळी संदीप आळेकर.सतीष तांबे.गणपत भांडारकर.दिनकर दिवेकर.सुभाष जाधव,प्रथमेश विधाटे.सुजल विधाटे.मुरलीधर देखणे.निलेश करंजखेले.बाबाजी गाढवे.सिताराम टेलर जाधव यांनी व्यवस्था पाहीली.मंदिराचे शिखरावर व परिसरात आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट केलेली होती.

धामणीच्या पवित्र संगमावरील पुरातन महादेव देवस्थानात उत्तम जाधव.एकनाथ जाधव.दिनेश जाधव यांच्या हस्ते तर येथील खंडोबा मंदिराच्या आवारातील महादेव मंदिरात सेवैकरी दादाभाऊ भगत.सुभाष तांबे.प्रभाकर भगत.शांताराम भगत.राजेश भगत यांनी महारुद्राभिषेक केला.रुद्राभिषेकाचे पौरोहित्य मुकुंद क्षिरसागर.बाळासाहेब बेरी व प्रमोद देखणे यांनी केले पहाडदरा येथील वाघ दर्‍यातील पुरातन महादेव मंदिरात पहाटे अभिषेक सरपंच मच्छिंद्र वाघ यांच्या हस्ते झाला त्यानंतर ह.भ.प.तान्हाजी महाराज तांबे यांचे किर्तन झाले.किर्तनाला अंबिका भजन मंडळीच्या टाळकर्‍यांनी साथ दिली यावेळी भाविकांना देवस्थानाच्या वतीने खिचडी केळीचे वाटप करण्यात आले दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.अवसरी.निरगुडसर मेंगडेवाडी येथील भाविक दर्शनासाठी आलेले दिसत होते,यावेळी उपसरपंच कैलास वाघ. फकीरा वायकर.दत्तात्रय वायकर.सिताराम वायकर.गणेश वायकर.सोमनाथ वीर व सेवेकरी वायकर.कुरकुटे.वाघ.वीर मंडळी उपस्थित होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
33.1 ° C
33.1 °
33.1 °
24 %
2.1kmh
0 %
Wed
45 °
Thu
45 °
Fri
44 °
Sat
45 °
Sun
43 °

Most Popular

Recent Comments