पुणे, – संशोधनाच्या क्षेत्रात गेली 108 वर्षे कार्यरत असणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या संग्रहातील महत्त्वाची हस्तलिखिते, ग्रंथ आणि मौल्यवान वस्तूंचा तसेच संशोधनप्रकल्पांचा समावेश असलेले “ज्ञानसागर” हे प्रदर्शन येत्या शनिवारपासून सुरु होत असून ते सलग तीन दिवस (21 ते 23 फेब्रुवारी) सर्वांसाठी खुले राहणार असल्याची माहिती कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव सुधीर वैशंपायन तसेच संस्थेच्या नियामक परिषदेचे सदस्य व प्रदर्शनाचे समन्वयक संतोष रासकर आणि मनोज एरंडे यांनी आज येथे दिली.
यावेळी पटवर्धन यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, पुण्याच्या नूतन महापौर मंजूषा नागपुरे यांच्या हस्ते शनिवारी (21 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. खेलरत्न पुरस्कार विजेत्या ऑलिंपिकपटू नेमबाज अंजली भागवत या प्रमुख अतिथी असतील, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष अभय फिरोदिया असतील. या प्रदर्शनासाठी प्रा. रवींद्र कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रदर्शन दररोज सकाळी 10 ते सायं. 8 या वेळेत सर्वांकरिता मोफत व खुले राहणार आहे.
या “ज्ञानसागर” प्रदर्शनाच्या निमित्ताने महाभारत-सांस्कृतिक सूची या संशोधन प्रकल्पातील “भीम” या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्मिता लेले यांच्या हस्ते होणार आहे. युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समाविष्ट हस्तलिखिते, सुलेखन असलेली हस्तलिखिते, भारतीय आणि परदेशी भाषांमधील दुर्मिळ पुस्तके यांचा समावेश या प्रदर्शनात असेल. संस्थेची 300 हून अधिक प्रकाशने, तसेच महाभारत, भागवत, अथर्ववेद, कोरीव लेख, वैज्ञानिक हस्तलिखिते आणि खगोलशास्त्रीय उपकरणे यांचा समावेश प्रदर्शनात असेल. देशातील मोठ्या शब्दकोशांपैकी एक, प्राकृत-इंग्रजी शब्दकोश प्रकल्प आणि ऐतिहासिक जैन व्यक्तिमत्त्वांचा कोश जैन प्रोसोपोग्राफी हेही येथे पाहता येतील. इन्फोसिस विद्याप्रकल्पातील संशोधकांनाही भेटता येणार आहे. सांस्कृतिक ठेव्याच्या जतनाकरिता संस्था करीत असलेले प्रयत्न पाहण्याची संधीही उपलब्ध राहील. तसेच संस्थेचे डिजिटल उपक्रम, भारतविद्या प्लॅटफॉर्म यांचा अनुभव, तसेच प्राचीन वैज्ञानिक ग्रंथाप्रमाणे केलेले प्रयोग आणि वेरुळच्या शिल्पांचे डिजिटल संवर्धन ही या प्रदर्शनाची विशेष आकर्षणे असतील.
––—–
ज्ञानसागर प्रदर्शनातून भांडारकर संस्थेच्या कार्याची परंपरा अनुभवता येणार !
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
35.7
°
C
35.7
°
35.7
°
32 %
2.8kmh
3 %
Fri
42
°
Sat
44
°
Sun
45
°
Mon
44
°
Tue
38
°


