30.8 C
New Delhi
Wednesday, March 4, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानसोनालिकाची फेब्रुवारीमधील १२,८९० ट्रॅक्टरची आजवरची सर्वोधिक विक्री

सोनालिकाची फेब्रुवारीमधील १२,८९० ट्रॅक्टरची आजवरची सर्वोधिक विक्री

शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या ३० वर्षांच्या पूर्तीचा आनंदोत्सव साजरा


पुणे – : कृषी यांत्रिकीकरणाच्या राष्ट्र उभारणीच्या स्वतःच्या ऐतिहासिक ३० व्या वर्षात सोनालिका ट्रॅक्टरने आपल्या प्रवासात एका नवीन सोनेरी अध्यायाची भर घातली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये फेब्रुवारीमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक १२,८९० ट्रॅक्टर विक्री नोंदविली आहे. ही नवीन ऐतिहासिक कामगिरी म्हणजे तिच्या व्यापक पातळीवरील दमदार कार्यान्वयनाची जोरदार पुष्टी असून ‘जीतने का दम’ (विजयाचा विश्वास) देण्याच्या सोनालिकाच्या मूळ विश्वासाचे मूर्त स्वरूप आहे. हा विश्वास म्हणजे शेतकऱ्यांना उज्ज्वल भविष्याचे आश्वासन देणारे तिचे अंतर्भूत सामर्थ्य आहे. अचूकतायुक्त शेती आणि प्रगत कृषी-तंत्रज्ञान सर्व प्रदेशांमध्ये वाढत आहे. अशा वेळेस स्पर्धेमध्ये पुढे राहण्यासाठी सोनालिका उत्पादन नाविन्यपूर्णतेचा सखोल शेतकरी सहभाग आणि बाजारपेठेतील गतिमान संपर्क यांच्याशी संयोग घडवून आणत आहे.

भारताचे कृषी क्षेत्र एका निर्णायक टप्प्यातून जात आहे. समर्थ धोरणात्मक पाठबळ, डिजिटल उपक्रमांद्वारे झपाट्याने यांत्रिकीकरण, कर्जाची सुलभ उपलब्धता तसेच शेती उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने ग्रामीण पायाभूत सुविधांवर खर्च वाढला आहे. सोनालिकाने अलीकडेच लाँच केलेल्या सोनालिका गोल्ड मालिकेसारखे भविष्यानुकूल ट्रॅक्टर विकसित करून जागतिक अभियांत्रिकी उत्कृष्टतेला सातत्याने चालना दिली आहे. ते तळागाळातील शेतीच्या वास्तविकतेशी सुसंगत असून सोन्यासारखी भविष्यातील सुरक्षितता आणि शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्मितीची ते हमी देतात. शाश्वत शेतीसाठी यांत्रिकीकरण ही केवळ एक गरज नव्हे तर अधिक काही आहे, असे सोनालिकाचे मत आहे. भारतीय शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन विकासाचा भागीदार म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी ती कायमच संलग्न, गतिमान आणि महत्त्वाकांक्षी आहे.

या नवीन विक्रमी कामगिरीविषयी आपले विचार मांडताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, “खरा विजयाचा विश्वास (‘जीतने का दम’) नेहमीच अशा शेतकऱ्यांचा असतो जे त्यांच्या शेतात प्रगतीची लागवड करण्यासाठी दररोज उठतात. शेतकऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि जीवनात यशस्वी होण्याचा दृढनिश्चय वाढवणारे हेवी ड्युटी ट्रॅक्टर तयार करणे ही आमची जबाबदारी आहे, असे आम्ही मानतो. भारताच्या कृषी परिवर्तनासाठी विकास उत्प्रेरक म्हणून ब्रँडचे स्थान त्यामुळे अधिक बळकट झाले आहे. शेतकऱ्यांच्या क्षमतेचे मोजमाप करण्यायोग्य प्रगतीमध्ये रूपांतर करण्याची आणि ग्रामीण समृद्धीला बळकट करण्यासाठी भारताच्या विकासगाथेला गती देण्याची आमची जबाबदारीसुद्धा या ऐतिहासिक वर्षामुळे नव्याने वाढली आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
30.8 ° C
30.8 °
30.8 °
17 %
4.8kmh
0 %
Wed
30 °
Thu
38 °
Fri
38 °
Sat
37 °
Sun
39 °

Most Popular

Recent Comments