35.1 C
New Delhi
Saturday, May 9, 2026
Homeमहाराष्ट्रगुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘दोराबजी हाइट्स’चे भव्य लॉन्चिंग

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘दोराबजी हाइट्स’चे भव्य लॉन्चिंग

- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि स्मिता गोंदकर यांची  प्रमुख उपस्थिती



–  ` ‘दोराबजी हाइट्स’ खास ऑफर २ बीएचकेच्या किमतीत ३ बीएचके

पुणे : उंड्री परिसरात उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक निवासी प्रकल्प ‘दोराबजी हाइट्स’चा भव्य लॉन्चिंग सोहळा गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि स्मिता गोंदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  या प्रसंगी  घर खरेदीदारांसाठी आकर्षक अशी २ बीएचकेच्या किमतीत ३ बीएचके फ्लॅट ऑफर जाहीर करण्यात आली.  या प्रकल्पातील फ्लॅट्सची किंमत ८१ लाख रुपयांपासून सुरू होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

बांधकाम क्षेत्रातील विश्वासार्ह नाव म्हणून ओळख असलेल्या दोराबजी समूहाचा हा प्रकल्प असून त्याची उभारणी दोराबजी, मन्नत असोशीएट आणि रितेश अग्रवाल व्हेंचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज, प्रशस्त आणि निसर्गरम्य परिसरात उभारला जाणारा हा प्रकल्प घर खरेदीदारांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
या प्रसंगी जहांगीर दोराबजी, डॅनियल दोराबजी, रितेश अग्रवाल व्हेंचर्सचे संस्थापक सतीश अग्रवाल, संचालक रितेश अग्रवाल, मनीष अग्रवाल, अंकुश अग्रवाल, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री स्मिता गोंदकर, अखिल भारतिय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट निर्माता – दिग्दर्शक अनिल काकडे,  अमन घई तसेच मन्नत असोशीएटचे सर्व संचालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, बांधकाम क्षेत्र आणि चित्रपटसृष्टी यांच्यात एक साम्य आहे ते म्हणजे घर. कलाकार लोकांच्या मनात घर करतात तर बांधकाम व्यावसायिक लोकांच्या मनातील घर निर्माण करतात. दोराबजी हाइट्स हा प्रकल्प निसर्गरम्य परिसरात असून येथील वातावरण अतिशय सकारात्मक आणि आनंददायी आहे. येथील फ्लॅट्स अत्यंत प्रशस्त असून मध्यवर्गीय कुटुंबालाही परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे नवीन घराच्या शोधात असलेल्या नागरिकांनी या प्रकल्पाला नक्की भेट द्यावी.”

यावेळी अभिनेत्री स्मिता गोंदकर म्हणाली,, “उंड्री परिसर प्रचंड विकसित झाला आहे, यांचा मला आनंद होतोय. मी वास्तु शास्त्र मानते आणि मला ‘दोराबजी हाइट्स’ही एक परफेक्ट वास्तु असल्याचे दिसले.  घरात भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा आणि सकारात्मक वातावरण असणे तितकेच महत्त्वाचे असते.  प्रशस्त जागा, सुंदर रचना आणि मोक्याचे स्थान यामुळे हा प्रकल्प खरेदीदारांसाठी आकर्षक ठरेल. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर किफायतशीर दरात उत्तम घर मिळविण्याची ही चांगली संधी आहे.”

जहांगीर दोराबजी म्हणाले, “वास्तुशास्त्र हे एक विज्ञान असून त्यानुसारच आमचे प्रकल्प उभारले जातात. आमचा कॅपिटल बिल्ट-अप रेशो कमी असल्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत प्रशस्त आणि प्रीमियम सदनिका उपलब्ध करून देणे शक्य होते. मोठ्या आणि आरामदायी फ्लॅट्स ही आमची खासियत असून या प्रकल्पात २ बीएचकेच्या किमतीत ३ बीएचके देण्याची ऑफर ग्राहकांसाठी खास ठरणार आहे.”

रितेश अग्रवाल यांनी सांगितले की, “दोराबजी हाइट्समध्ये ३० हून अधिक अत्याधुनिक अॅमेनिटीज देण्यात येत आहेत. हिलसाइड व्ह्यू, शांत निवासी परिसर आणि शाळा, रुग्णालये, मॉल्स तसेच हायस्ट्रीटसारख्या पायाभूत सुविधांच्या जवळ हा प्रकल्प आहे. येथे स्विमिंग पूल, दोन कम्युनिटी हॉल, मल्टी-क्युजिन रेस्टॉरंट, कार्यक्रमांसाठी ओपन एरिया, रुफटॉप सुविधा यांसह कंट्री क्लबचे मोफत सदस्यत्वही देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
35.1 ° C
35.1 °
35.1 °
31 %
2.1kmh
20 %
Sat
35 °
Sun
41 °
Mon
44 °
Tue
44 °
Wed
45 °

Most Popular

Recent Comments