31.1 C
New Delhi
Wednesday, May 20, 2026
Homeमहाराष्ट्रमिनर्वा' मध्ये युवा ऊर्जेचे दर्शनडॉ.प्रमोद कुमार यांचे विचार

मिनर्वा’ मध्ये युवा ऊर्जेचे दर्शनडॉ.प्रमोद कुमार यांचे विचार

आयएसबीएम कॉलेज ऑफ कॉमर्स च्या ‘ मिनर्वा’ मध्ये युवा प्रतिभा व नेतृत्वाचा दिसला आत्मविश्वास

पुणे , -” विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोरबच सर्जनशीलता , नावीन्य आणि युवा ऊर्जेचे दर्शन घडावे. यासाठी शैक्षणिक अभ्यासापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासा साठी मिनर्वा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ” असे विचार आएसबीअ‍ॅडएम चे अध्यक्ष डॉ.प्रमोद कुमार यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयएसबीएम कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या मिनर्वा २०२६ च्या प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी प्राचार्य डॉ.मनीष सिंह, विभाग प्रमुख प्रा. दीप्ती देशपांडे, कलाकार सबाली द बँड चे कलाकार विद्यार्थी प्रतिनिधी ब्रायन सायमन आणि वेदांत ढोरे उपस्थित होते.

सर्जनशीलनता, नाविन्य आणि तरुणाईचा उत्साह साजरा करण्यासाठी मिनर्वा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मिनर्वा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलात्मक, सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक गुणांना वाव देण्यासाठी एक चैतन्यमय व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये 87 महाविद्यालये, 200 संघ सहभागी झाले होते. या मध्ये एमआयटी, सिम्बॉयसिस, अण्णासाहेब मगर कॉलेज, जेएसपीएम, इंदिरा l, दिल्ली युनिव्हर्सिटी आणि ग्वाल्हेर येथील माधव म्युझिक कॉलेजचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

मिनर्वा महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचा समावेश होता. अभिनय, गायन (एकल, द्वंद आणि समूह), नृत्य (एकल, द्वंद आणि समूह), फॅशन शो, बॅटल ऑफ बँडस, बाईक शो, बीजीएमआय गेमिंंग स्पर्धा, नुक्कड नाटक आणि ओपन डीजे सह एका अत्यंत जोशपूर्ण आर्टिस्ट नाईट चा समावेश होता.

या संदर्भात डॉ.मनीष सिंह यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, सांघिक भावना, नेतृत्व गुण आणि स्पर्धात्मक वृत्ती जोपासणे तसेच विविध महाविद्यालयांमधील परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देणे हेच मिनर्वाचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

प्रा. दीप्ती देशपांडे म्हणाल्या,” सहभागी सर्व विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अविस्मरणीय आणि समृद्ध असेल. यासाठी महोत्सवाच्या आयोजनात अत्यंत बारकाईने आणि नियोजन बद्ध पद्धतीने काम करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
29 %
1.5kmh
0 %
Wed
45 °
Thu
45 °
Fri
44 °
Sat
45 °
Sun
46 °

Most Popular

Recent Comments