29.1 C
New Delhi
Thursday, April 30, 2026
Homeमहाराष्ट्रराजभवन (लोकभवन) रस्त्याच्या रुंदीकरणाला लवकरच गती — अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन

राजभवन (लोकभवन) रस्त्याच्या रुंदीकरणाला लवकरच गती — अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन

पुणे – पाषाण–औंध परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण घडामोड झाली असून, राजभवन रोड (सद्य: लोकभवन रोड) या अत्यंत महत्त्वाच्या व्हीआयपी मार्गाच्या रुंदीकरणाबाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

आज मा. अतिरिक्त आयुक्त दिवटे साहेब यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरत असलेल्या पोलीस विभागाच्या तीन इमारतींचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. संबंधित परवानग्या उपलब्ध असूनही विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे काम प्रलंबित राहिल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावर मा. अतिरिक्त आयुक्तांनी तातडीने दखल घेत, येणाऱ्या काही महिन्यांत पोलीस विभागाच्या सर्व संबंधित इमारतींचे स्थलांतर पूर्ण करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल, असे ठाम आश्वासन दिले.

राजभवन (लोकभवन) रस्ता हा पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना जोडणारा प्रमुख मार्ग असून, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक तसेच व्हीआयपींची ये-जा होत असते. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे औंध–पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

तसेच, ब्रेमेन चौक ते औंध राजीव गांधी पूल दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पालाही यामुळे गती मिळणार असून, भविष्यात संपूर्ण परिसरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे.

नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करत, काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असे नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
29.1 ° C
29.1 °
29.1 °
48 %
2.6kmh
20 %
Wed
31 °
Thu
39 °
Fri
39 °
Sat
42 °
Sun
42 °

Most Popular

Recent Comments