31.1 C
New Delhi
Wednesday, May 20, 2026
Homeक्रीड़ाएमआयटीत मल्ल विद्येला संजीवनी देण्याचे कार्य -डॉ. विश्वनाथ कराड यांचे मत

एमआयटीत मल्ल विद्येला संजीवनी देण्याचे कार्य -डॉ. विश्वनाथ कराड यांचे मत

 हनुमान जन्मोत्सवा निमित्त एमआयटी डब्ल्यूपीयूत कुस्तीचे आयोजन

पुणे, – : ” मऊ मेणाहूनि आम्ही विष्णूदास कठीण वज्रास भेदू ऐसे अशी परंपरा असलेल्या एमआयटीत वैश्विक स्तरावरील पैलवान निर्माण होत आहेत. बलवान आणि बुद्धिमान असा उल्लेख असलेल्या मल्ल विद्येला संजीवनी देण्यासाठी एमआयटी डब्ल्यूपीयूत सातत्याने कुस्ती स्पर्धेचे आयोजन होत आहेत” असे मत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.

हनुमान जन्म उत्सवा निमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या आखाड्यात विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी तर्फे पुण्यातील पैलवानांसाठी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हेाते. त्यावेळी ते बोलत होते.

या स्पर्धेत जवळपास १००हून अधिक पैलवानांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. उद्घाटनाची कुस्ती खुल्या वजनी गटात एमआयटी तालमीचा अनुदान चव्हाण आणि हिंदकेसरी आखाड्याचा अक्षय उघाडे यांच्यात सलामीची लढत झाली. ज्यात पै. अनुदान चव्हाण  हा विजयी झाला. अंतिम सामन्यात एमआयटीचा  पै. निखिल वाडेकर व  खडकवासला तालिमीचा वैष्णव मारणे  यांच्यात अटीतटीची कुस्ती झाली. ज्यामध्ये पै.निखिल वाडेकर विजयी ठरला.
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात असलेल्या हनुमान मंदिरात महापूजा केली. या नंतर कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी एमआयटी वर्ल्ड पीस युव्हिर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, सौ. डाॅ.आदिती कराड, सौ.उषा विश्वनाथ कराड, डॉ. सुचित्रा कराड,  प्रा. स्वाती कराड-चाटे,  डब्ल्यूपीयु चे कुलगुरू डॉ.आर. एम. चिटणीस, प्रा.गणेश पोकळे,  डॉ. संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस.एन.पठाण, डॉ. मिलिंद पांडे, माईर्स चे कुलसचिव रत्नदिप जोशी, डाॅ. महेश थोरवे, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक व पंच प्रा. विलास कथुरे, क्रीडा विभागाचे संचालक डाॅ. वैभव वाघ उपस्थित होते.

प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, कुस्तीमुळे ताकद आणि रणनीती विकसित होते. विद्यार्थ्यांनी व्यायामाबरोबरच अभ्यास करावा. बुध्दी आणि शक्तीच्या जोरावर कुस्ती क्रीडा प्रकारात यश मिळविता येते.
डॉ. राहुल कराड म्हणाले, कुस्तीमध्ये मन आणि मनगट मजबूत होते. त्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड यांनी विद्यापीठामध्ये कुस्तीचा आखाडा निर्माण केला. भारतीय संस्कृतीत मल्ल विद्या आहे. त्याचे जतन होताना दिसत आहे.  मल्ल विद्येबरोबर ज्या व्यक्तिचे आचार विचार चांगले आहेत तोच खरा व्यक्ती आहे.
वजन गट               विजेता व तालिम                                     उपविजेता व तालिम
खुला गट              निखिल वाडेकर, एमआयटी                    वैष्णव मारणे, खडकवासला.
८६ किलो             अर्पित कंधारे, एमआयटी                        तेजस शिंदे, उत्तमनगर.
७४ किलो             हर्षवर्धन उबाळे, सह्याद्री संकूल                शिवजीत गायकवाड, घोरपडी
७० किलो             चैतन्य खंडाळे, कोथरूड                         आरुष घारे, एमआयटी.
६१ किलो             स्वराज घोडके, बालेवाडी,                       शिवदत्त कांबळे, खडकी.
६५ किलो             सुशांत भोसले, खडकी                           अभिजीत पवार, येरवडा.
५७ किलो             समर्थ दाभाडे, हिंद केसरी आखडा.         स्वराज शिंदे, बाणेर
५१ किलो             वेदांत चव्हाण, एमआयटी                       आर्यन बेनकर, सह्याद्री संकूल.
४५ किलो             साईराज भिलारे, सह्याद्री संकूल.             संग्राम सपकाळ, एमआयटी   
४१ किलो             अश्विन चव्हाण, कोथरूड                          कुणाल देशमुख,  सह्याद्री संकूल.
३८ किलो             रुद्र देशमुख, सह्याद्री संकूल.                 ओम  डफळ, खाशाबा जाधव संकूल.
३२ किलो             संग्राम आमले, मुळशी                          दर्शन शिंदे, औंध
 २८ किलो           युवराज भरेकर, खडकवासला               प्रणव जोरकर, महाराष्ट्रीय मंडळ

सामन्यातील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे बाल कुस्तीपटूंचा मोठ्या संख्येने सहभाग होता.प्रा. विलास कथुरे यांनी प्रस्तावनेत एमआयटी तर्फे चालविल्या जाणार्‍या सर्व कुस्ती स्पर्धेची माहिती दिली. तसेच येथे देशातील सर्व नामांकित पैलवानांनी भेट दिल्याचा उल्लेख केला.
कुस्तीचे धावते समालोचन बाबा निम्हण यांनी केले.
 सूत्र संचालन प्रा.विलास कथुरे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
29 %
1.5kmh
0 %
Wed
45 °
Thu
45 °
Fri
44 °
Sat
45 °
Sun
46 °

Most Popular

Recent Comments