उरळी देवाची (उरळी देवाची, येवलेवाडी, उंड्री पिसोळी, वडकी,कात्रज-फुरसुंगी रोड, दिवे घाट,कानिफनाथ) येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची पुणे जिल्ह्यातील शाखा क्रमांक 24 सर्वसंमतीने सुरु करण्यात आली.गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या व नव्याने समाविष्ट झालेल्या या भागातील विखूरलेला ब्राह्मण समाज या निमित्ताने एकत्र आला आहे.भगवान परशुराम जयंती निमित्त कार्यक्रम घेण्याचे व या भागातील जास्तीत जास्त ब्राह्मण कुटुंबे जोडण्याचे ठरले.गेल्या तीन वर्षात पुणे जिल्ह्यात एकूण 24 शाखा सुरु करण्यात आल्या व पुणे जिल्ह्यातील सर्व ब्राह्मण समाज जोडण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंदार रेडे यांनी सांगितले.पुणे जिल्ह्यातर्फे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, ब्रह्मद्योग आघाडीचे अक्षय जोशी, सुप्रिया कुलकर्णी, सुयोग सोंडुर व या भागातील अनेक ब्रह्मवृंद उपस्थित होते.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची उरळी देवाची शाखा स्थापन
RELATED ARTICLES
New Delhi
haze
24.1
°
C
24.1
°
24.1
°
43 %
2.6kmh
40 %
Mon
27
°
Tue
31
°
Wed
29
°
Thu
31
°
Fri
34
°


