political News | मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. १२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. तर १२ मे रोजीच निकाल जाहीर
होणार आहे. politics
विधान परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्यातून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासह प्रशांत परिचारक हे स्पर्धेत असून मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या संमतीनेच एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या निवृत्त होणाऱ्या विधान परिषद आमदारांमध्ये रणजीत सिंह मोहिते पाटील यांचे नाव असून त्यांचा विचार याही वेळी होणार का? हाही चर्चेचा विषय आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर या दोन्ही जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी मोहिते पाटलांची नाराजी भाजपला त्रासदायक झाल्याने माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले. तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवला होता. ज्या ठिकाणी या दोन्ही खासदारांना लीड मिळाले ते सर्व मतदार संघ मोहिते पाटील यांच्या ताकतीचे असल्याने माढा बरोबर सोलापूरची जागाही आरामात निवडून आली होती. आता विधान परिषदेला संधी देताना २०२९ लोकसभा निवडणुकीचा विचार करूनच भाजप उमेदवार देणार असून यात राजन पाटील आणि प्रशांत परिचारक हे दोघे भाजपच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहेत. political
राजन पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील एक ताकदवान नाव असून मोहोळसह माढा मंगळवेढा आणि सोलापूरमध्ये त्यांचे अतिशय चांगले नेटवर्क असल्याने राजन पाटील यांचा फायदा सोलापूर आणि माढा या दोन्हीही लोकसभा मतदारसंघात भाजपला होणार आहे.
प्रशांत परिचारक यांना बावनकुळेंनी विधान परिषदेत संधी देण्याचे दिले होते आश्वासन
प्रशांत परिचारक यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत माघार घेऊन आमदार समाधानावताडे यांना निवडून आणले होते. त्यावेळी तात्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिचारक यांना विधान परिषदेत संधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नुकत्याच झालेल्या पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी विरोधी आघाडीचे डॉक्टर प्रणिता भालके विजयी झाल्याने परिसरात यांच्यासाठी हा धक्का आहे. याशिवाय पंचायत समिती निवडणुकीतही परिचारक यांना चांगली कामगिरी दाखवताना आल्याने परिचारक यांच्या नावाला भाजप कितपत पसंती देणार हे देखील पहावे लागणार आहे.
बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत हे देखील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार असून गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना विरोध केला होता. यातूनच त्यांचा निसटत्या मताने पराभव झाला होता. यानंतर झालेल्या बार्शी नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकीत राऊत यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊनही राऊत यांनी मिळिवलेला विजय हा त्यांची क्षमता दाखवणारा होता. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूरमधून राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेसाठी संधी देण्याची शक्यता आहे.
मोहिते पाटील आणि भाजप यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्यामुळे सध्या तरी रणजीत सिंह मोहिते पाटील यांचे नाव फारसे चर्चेत नाही. मात्र रणजितसिंह मोहिते पाटील हे शिवसेना शिंदे गटातून विधान परिषदेत जाण्याची चर्चाही सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंचायतराज निवडणुकीत उघडपणे मोहिते पाटलांना टोकाचा विरोध करीत जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपरिषदांमध्ये विजय मिळिवला होता. आता भाजप मोहिते विरोधाचा हाच ट्रेंड सुरू ठेवणार असेल तर रणजीत सिंह मोहिते पाटील हे एकनाथ शिंदे गटातून आमदार झाल्यास नवल नाही.
राम सातपुते यांना पक्षाने सोलापूर लोकसभा आणि त्यानंतर लगेचच माळिशरस विधानसभा अशा दोन्ही वेळी संधी दिली, मात्र त्यांचा दोन्ही निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे सातपुते यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी दिसत असली तरी सध्या त्यांचे हे नाव जोरात चर्चेत आहे.


