38.8 C
New Delhi
Friday, June 19, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात २ मे रोजी ‘आम्ही भारताचे लोक’चा भव्य स्नेहसंमेलन मेळावा

पुण्यात २ मे रोजी ‘आम्ही भारताचे लोक’चा भव्य स्नेहसंमेलन मेळावा

साहित्य, कला आणि आंबेडकरी विचारांचा महाउत्सव

पुणे – आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने पहिले राज्य स्नेह संमेलन दि. २ मे २०२६ रोजी निळू फुले सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील कवी, साहित्यिक, कलाकार व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी गीतांनी वातावरण निर्मिती, नोंदणी व स्वागताने होणार असून त्यानंतर उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. या सत्रात मा. बी. जे. कोळसे पाटील, मा. वसंत दादा साळवे, मा. बबन दादा सरवदे, मा. विठ्ठल दादा गायकवाड, मा. सुभाष वारे, मा. विशाल लोंढे, मा. डॉ. बबन जोगदंड, मा. जगदीश ओहोळ, मा. प्रकाश जावळे, मा. आकाश आप्पा सोनवणे, मा. राजाभाऊ कांबळे हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. नितीन घोडके करणार असून अहवाल वाचन सविता केदारे करणार आहेत.

यानंतर उठाव साहित्य मंच अंतर्गत कवितांचे सत्र रंगणार असून बबन सरवदे, गजानन गावंडे, सुदेश जगताप, डॉ. अविनाश चंपतराव मनवर, समाधान मस्के, पप्पू धोंडीराम रोडे, संतोष गुंजिदास पाटील, ऍड. नितीन घोडके, संघशिल भद्रे उर्फ एस.एन. नांदेडकर सर, गायकवाड नितीन, भास्कर मंगल, रुकेश सावंत, अंकुश बळीराम सोनवणे, मोहिनी शेजवळ हे कवी सहभाग नोंदवणार आहेत. या सत्राचे अध्यक्षपद आकाश आप्पा सोनवणे भूषवणार आहेत.
गायन व सादरीकरण सत्रात कविता काळे, ऍड. प्रियंका गायकवाड, विश्वजीत नंदकिशोर कांबळे, संतोष अण्णासाहेब रायते, प्रशांत लक्ष्मण कदम, समाधान तुकाराम पारधे, मिलिंद अवचित इंगळे, मुरली जाधव, महेश सागर शिवशरण, गायकवाड नितीन भास्कर (नृत्य) आपली कला सादर करणार आहेत.
मनोगत सत्रात डॉ. अविनाश चंपतराव मनवर, स्वप्निल सुनंदा सुरेश जाधव, ऍड. अदिती विनायक पवार, कबीर शेख, शंकर गायकवाड, शंकर नारायण अवचार, शांतेष जाधव, सुषमा रामटेके, मिसेस सुनंदा आनंद साबळे, विकास मस्के, वनिता मस्के, संतोष किसान बाविस्कर, राहुल भिमराव जोगदंडे, शांतीलाल मच्छिंद्र खरात, निशिकांत विजय खरात, विश्वनाथ रंजना पडेलकर, शैलेश वाकडे, सुकलाल पाटील, सुमित गुणवंत हे आपले विचार मांडणार आहेत.

दुपारनंतर “तरी आम्ही बोलू नये” काव्य मैफिलीत सुमित गुणवंत, रमणी बबिता आकाश यांच्यासह इतर कवी सहभागी होणार आहेत. विशेष सादरीकरणात संतोष गुंजिदास पाटील (नाट्य), दीपक भाऊ कसबे (आरोग्य मार्गदर्शन) व बापू बोरसे (आर्थिक मार्गदर्शन) मार्गदर्शन करणार आहेत.

महिला विशेष सत्राचे नियोजन वैशाली देठे, कविता काळे, रश्मी प्रक्षाळे, सुरेखा भालेराव, ऍड. प्रियंका गायकवाड, सविता केदारे, सुनंदा साबळे, रिता रामटेके यांनी केले आहे. या सत्रात विविध स्पर्धा व सांस्कृतिक सादरीकरण होणार आहे.
दुसऱ्या कविता सत्रात समाधान तुकाराम पारधे, मिलिंद अवचित इंगळे, सविता केदारे, कवी सुभाष मानवटकर, माला आनंद मेश्राम, वैशाली राजू देठे, रजनी रवि संबोधी, धीरजकुमार नंदागवळी, नागोराव विठोबा तायडे, श्रेयश विजय यादव, श्रेयस यादव, रविचंद्र गवळी सहभागी होणार असून अध्यक्षपद विठ्ठलदादा गायकवाड भूषवणार आहेत.

समारोप सत्रात समाधान तुकाराम पारधे, मिलिंद अवचित इंगळे, महेश सागर शिवशरण, गायकवाड नितीन भास्कर (नृत्य) सादरीकरण करणार आहेत. बक्षीस वितरण सोहळ्याचे नियोजन विशाल वाघमारे, शांतेष जाधव, अंकुश सोनवणे, प्रशांत देठे, शिलरत्न गायकवाड, प्रशांत कदम यांनी केले आहे.
संध्याकाळी प्रश्नोत्तर सत्र, मनोरंजन, सामूहिक नृत्य जल्लोष आणि समारोप सोहळा पार पडणार आहे. अध्यक्षीय भाषण, आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या भव्य स्नेह संमेलनात राज्यभरातील कवी, साहित्यिक, कलाकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून मुक्कामी राहणाऱ्या सदस्यांसाठी रात्री विशेष काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. असे आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक यांनी कळविले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
38.8 ° C
38.8 °
38.8 °
24 %
4.8kmh
14 %
Fri
39 °
Sat
42 °
Sun
42 °
Mon
40 °
Tue
42 °

Most Popular

Recent Comments