35.4 C
New Delhi
Tuesday, June 23, 2026
HomeTop Five Newsअखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे पुण्यात भव्य ब्राह्मण मेळावा

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे पुण्यात भव्य ब्राह्मण मेळावा

मान्यवरांचा होणार सन्मान

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणेच्या वतीने शनिवारी, ९ मे २०२६ रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे भव्य ब्राह्मण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी दिली.

या मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये चितळे उद्योग समूहाच्या सुनीता चितळे, धर्मावत ग्रुपचे देवाराम धर्मावत, सुप्रसिद्ध नाट्यकलावंत प्रशांत दामले, दाते पंचांगचे मोहन दाते तसेच पितांबरी कंपनीचे उपाध्यक्ष परीक्षित प्रभुदेसाई यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे, आमदार भीमराव तापकीर, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज यांच्यासह महासंघाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यामध्ये महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, प्रदेशाध्यक्ष मोहिनी पत्की, राष्ट्रीय सरचिटणीस सत्यजित कुलकर्णी, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जोशी तसेच प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांचाही सहभाग असणार आहे.

मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणून “संभवामि युगे युगे” या भगवद्गीतेवर आधारित नृत्याविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना सोनाली कुलकर्णी आणि त्यांच्या शिष्यांकडून हा विशेष कलाविष्कार सादर केला जाणार आहे. दुपारी ४.३० वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
35.4 ° C
35.4 °
35.4 °
25 %
3.3kmh
48 %
Mon
35 °
Tue
42 °
Wed
39 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

Recent Comments