37.1 C
New Delhi
Saturday, June 20, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानबीएसएच ने भारतात आणले पहिल्यांदाच 'परफेक्ट-फिट' चार दरवाजांचे साईड-बाय-साईड फ्रिज

बीएसएच ने भारतात आणले पहिल्यांदाच ‘परफेक्ट-फिट’ चार दरवाजांचे साईड-बाय-साईड फ्रिज

प्रीमियम फ्रीजच्या दुनियेत होणार मोठा बदल

•आधुनिक भारतीय स्वयंपाकघरांच्या गरजा आणि वास्तविकता लक्षात घेऊन डिझाइन केलेल्या एका नवविचाराच्या प्रस्तावनेसह बीएसएच चे प्रीमियम कूलिंग पोर्टफोलिओ अधिक वाढीव बनवते.
•बीएसएच इंडियाच्या भारतातील कूलिंग व्यवसाय दुप्पट करण्याच्या आणि प्रत्येक बाबतीत संपूर्ण असा प्रीमियम कूलिंग व्यवसाय उभारण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरतो.

पुणे , : भारतीय ग्राहकांना आता दिसायला सुंदर असतील, वापरण्यास सोपी असतील आणि त्यांच्या आधुनिक जीवनशैलीला साजेशा असलेल्या उपकरणांची आवड निर्माण झाली आहे. ग्राहकांची हीच गरज ओळखून ‘ बीएसएच होम अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड’ ने वेगाने वाढणाऱ्या साईड-बाय- साईड रेफ्रिजरेटरने बाजारात पाऊल ठेवले आहे. कंपनीने आपले नवीन ‘बॉश’ आणि ‘सीमेन्स’ ब्रँडचे चार दरवाजांचे साईड-बाय-साईड फ्रिज लाँच केले आहेत. प्रीमियम साईड-बाय-साईड फ्रीजचा लूक आणि बॉटम फ्रीझर (खाली फ्रीझर असणारी डिझाईन) ची सोय, या दोन्ही गोष्टी एकत्र करून ही नवीन खास शहरातील भारतीय कुटुंबांच्या गरजेनुसार तयार करण्यात आली आहे. आधुनिक शहरी घरांमध्ये आणि मॉड्युलर किचनमध्ये सहज बसेल अशा प्रकारे कमी जागेत जास्त साठवणूक क्षमता या फ्रीजमध्ये देण्यात आली आहे.

हा देशातील असा एकमेव फ्रीज आहे जो तुमच्या किचनच्या ओट्याशी आणि कॅबिनेटशी अगदी तंतोतंत मेळ खातो, ज्यामुळे हा फ्रीज वेगळा न दिसता किचनचाच एक भाग वाटतो. यामध्ये काऊंटर-डेप्थ डिझाईन, जवळपास शून्य अंतराने इंस्टॉलेशन, ११५° वर असलेले भिंतीपासून संरक्षित दरवाजे, बदलण्याजोगे तापमान कप्पे आणि फ्रीझरसाठी खास कप्पे देण्यात आले आहेत. यामुळे भारतीय कुटुंबांना खाद्यपदार्थ साठवणे, ते व्यवस्थित ठेवणे आणि ताजे ठेवणे खूप सोपे जाईल. तसेच, हा फ्रीज तुम्ही किचनमध्ये स्वतंत्रपणे कुठेही ठेवू शकता, ज्यामुळे हा प्रत्येक आधुनिक भारतीय स्वयंपाकघरासाठी योग्य पर्याय ठरतो.

या लाँचिंगच्या माध्यमातून बीएसएच कंपनी बॉश आणि सीमेन्स या दोन वेगवेगळ्या ब्रँड्स अंतर्गत ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करत आहे. ‘बॉश साईड-बाय-साईड’ फ्रीज हा भारतीय लोकांच्या खाण्यापिण्याच्या आणि साठवणुकीच्या सवयींचा सखोल अभ्यास करून बनवला गेला आहे, ज्यामुळे हा भारतातील सर्वात विचारपूर्वक डिझाईन केलेला फ्रीज ठरतो. यातील प्रत्येक वैशिष्ट्य भारतीय कुटुंबांना ताजेपणा आणि अधिक सोय देण्यासाठी तयार केले आहे. दुसरीकडे, ‘सीमेन्स साईड-बाय-साईड’ हा फ्रीज आपल्या कॅबिनेटमध्ये चपखल बसण्याच्या वैशिष्ट्यामुळे ‘स्लॉट-इन सेमी इंटिग्रेटेड’ तंत्रज्ञानाने स्वयंपाकघरात शोभून दिसेल. याचे देखणे रूप आणि स्मार्ट इंजिनिअरिंग आधुनिक घरांची शान आणखी वाढवते.

या लाँचिंगबद्दल बोलताना बीएसएच होम अप्लायन्सेसचे एमडी आणि सीईओ सैफ खान म्हणाले, “भारतात दररोज ताजे खाद्यपदार्थ तयार करण्याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व आता ते खाद्यपदार्थ व्यवस्थित टिकवून ठेवण्यालाही दिले जात आहे. ग्राहक आता एकाच वेळी जास्त किराणा आणि भाज्या खरेदी करत आहेत, जेवणाचे नियोजन वेगळ्या पद्धतीने करत आहेत आणि खाद्यपदार्थ वाया न घालवता ते जास्त काळ ताजे कसे राहील, याचे हुशार पर्याय शोधत आहेत. त्यामुळे भविष्यातील फ्रिज हे केवळ त्यांच्या आकारावरून किंवा वैशिष्ट्यांवरून ठरवले जाणार नाहीत, तर ते खाद्यपदार्थ किती हुशारीने ताजे ठेवतात, स्वयंपाकघरात कसे बसतात आणि आपले जीवन किती सोपे करतात यावर ठरेल. आजच्या भारतीय ग्राहकाला केवळ देखावा नको आहे, तर शहरी जीवनशैलीच्या वेगाला आणि जागेला साजेसे डिझाईन हवे आहे. आमच्या नवीन बॉश आणि सीमेन्स चार दरवाजांच्या फ्रिजच्या माध्यमातून आम्ही अशी डिझाईन आणि सोय बाजारात आणली आहे, जी आधी कधीच उपलब्ध नव्हती.

रेफ्रिजरेशन हे आमच्या वाढीचे मुख्य उद्दिष्ट आहे. आम्ही २०२६ हे वर्ष ‘ बीएसएच इंडियाचे रेफ्रिजरेशन वर्ष’ म्हणून घोषित केले असून, आम्ही उत्पादने, नवनवीन तंत्रज्ञान आणि मार्केट वाढवण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहोत. आमचा उद्देश केवळ या बाजारात स्पर्धा करणे हा नसून, प्रगत कुलिंग क्षेत्रात एक नवा कल निर्माण करणे हा आहे. ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या मजबूत इतिहासासह आम्ही भारतातील आमचा फ्रीज उद्योगात मोठी वाढ करण्यास सज्ज आहोत.”

खास वैशिष्ट्ये:
•काऊंटर-डेप्थ डिझाईन (५९४ एमएम खोली): हे सामान्य मॉड्युलर किचनच्या आकारात सहज आणि चपखळ बसते, ज्यामुळे मोठे फ्रीज बाहेर आल्यासारखे विजोड दिसत नाहीत.
•जवळपास शून्य अंतराचे इन्स्टॉलेशन: महागातले इन-बिल्ट उपकरण न खरेदी करताही हे किचन कॅबिनेट मध्ये अगदी चपखल बसते आणि प्रीमियम लूक देते.
•खास साईड-बाय-साईड + बॉटम फ्रीझर रचना: यामध्ये वरच्या बाजूला प्रीमियम फ्रीज आणि खाली फ्रीझर दिला आहे, ज्यामुळे रोज लागणाऱ्या भाज्या आणि खाद्यपदार्थ काढण्यासाठी परतपरत वाकावे लागत नाही.
•११५° भिंतीपासून संरक्षित दरवाजे: फ्रीज भिंतीच्या किंवा कॅबिनेटच्या अगदी जवळ ठेवला असला, तरी त्याचे दरवाजे पूर्ण उघडतात. यामुळे मोठी भांडी किंवा ट्रे आत ठेवणे आणि बाहेर काढणे सोपे होते.
•५०३एल क्षमता: भारतीय कुटुंबांच्या साठवणुकीच्या गरजेसाठी भरपूर आणि योग्य जागा.
•बदलण्याजोगे तापमान कप्पे: तुमच्या गरजेनुसार ग्राहक या भागाचे तापमान बदलू शकतात. मग शीतपेये थंड करणे असो, मॅरीनेट केलेले पदार्थ ठेवणे असो की इतर खाद्यपदार्थ टिकवणे, हे सर्व सोपे होते.
•४ खास फ्रीझर कप्पे: गारठवलेले अन्न, नाष्ट्याचे पदार्थ, तयार पदार्थ आणि मसाले एकमेकांत मिसळू नयेत म्हणून ते स्वच्छतेने वेगळे ठेवण्यास मदत होते.
•२ लगेच हाताला लागणाऱ्या फ्रीझर ट्रे: जास्त वापरल्या जाणाऱ्या गारठलेल्या वस्तू संपूर्ण फ्रीझर न विस्कटता झटपट काढता येतात.
•प्रगत हायजीन आणि दुर्गंधी नियंत्रण यंत्रणा: एका पदार्थाचा वास दुसऱ्या पदार्थाला लागत नाही, ज्यामुळे प्रत्येक पदार्थाचा स्वाद टिकून राहतो आणि ते ताजे राहते.
•विचारपूर्वक केलेली अंतर्गत रचना: फ्रीजमधील सर्व वस्तू स्पष्ट दिसतात आणि सहज हाताशी येतात, ज्यामुळे एखादा पदार्थ शोधण्यात वेळ वाया जात नाही आणि पदार्थ पडून राहून खराब होत नाहीत.

हे नवीन बॉश आणि सीमेन्स फोर-डोअर साईड-बाय-साईड फ्रिज संपूर्ण भारतातील बॉश आणि सीमेन्सच्या प्रमुख ब्रँड स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
37.1 ° C
37.1 °
37.1 °
28 %
4.2kmh
0 %
Fri
37 °
Sat
41 °
Sun
41 °
Mon
40 °
Tue
42 °

Most Popular

Recent Comments