37.2 C
New Delhi
Saturday, July 18, 2026
HomeTop Five Newsआषाढी यात्रेनिमित्त दर्शन रांगेत चहा, पिण्याचे पाणी व खिचडी वाटप

आषाढी यात्रेनिमित्त दर्शन रांगेत चहा, पिण्याचे पाणी व खिचडी वाटप

भाविकांसाठी मंदिर समितीची विशेष व्यवस्था

पंढरपूर,- : आषाढी (ashadhi wari) यात्रेला सुरुवात झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दर्शन रांगेतील भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच एकही भाविक उपाशी राहू नये, यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने दर्शन रांगेत मोफत चहा, शुद्ध थंड पिण्याचे पाणी व खिचडीचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

दर्शन रांगेतील भाविकांसाठी तांदळाच्या खिचडीच्या वाटपाचा शुभारंभ आज मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख विनोद पाटील तसेच विशाल माने उपस्थित होते.

दर्शन रांगेतील विविध ठिकाणी स्टॉल उभारून भाविकांना दिवसरात्र शुद्ध थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच चहाचे वाटप सुरू असून नियमित तांदळाची खिचडी दिली जात आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांसाठी विशेषतः साबुदाण्याच्या खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे. दर्शन रांगेतील चहा, पाणी व खिचडी वाटपाची सेवा श्री संत गजानन महाराज मठ, अकोला येथील स्वयंसेवक अत्यंत समर्पित भावनेने देत आहेत. त्यांच्या सेवेमुळे हजारो भाविकांना दर्शनाच्या प्रतीक्षेदरम्यान दिलासा मिळत आहे. याशिवाय अन्नदानेश्वर महाराज, जिल्हा बिदर (कर्नाटक) तसेच जळगाव सेवा समिती या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रिध्दी-सिद्धी दर्शन मंडपात भाविकांसाठी मोफत अन्नदानाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
37.2 ° C
37.2 °
37.2 °
34 %
2.7kmh
100 %
Fri
37 °
Sat
42 °
Sun
41 °
Mon
38 °
Tue
29 °

Most Popular

Recent Comments