करमाळा- माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार सातत्याने महायुतीला जोरदार झटके देत आहे. शिवसेना शिंदे गटाचा माजी आमदाराला पक्षात घेत पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे . करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत .माजी आमदार नारायण पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे . नारायण पाटील यांच्या समवेत करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती ,माजी पंचायत समीती सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी जि.प.सदस्य , गावोगावचे सरपंच यांच्या सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नारायण पाटील यांचा प्रवेश होणार आहेय यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
शिंदे सेनेला शरद पवारांचा दे धक्का
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
36.2
°
C
36.2
°
36.2
°
41 %
1.6kmh
85 %
Fri
36
°
Sat
39
°
Sun
38
°
Mon
31
°
Tue
33
°