21.1 C
New Delhi
Wednesday, October 15, 2025
Homeताज्या बातम्याशिरूरच्या विजयासाठी भाजपाचा कार्यकर्ता वचनबद्ध - जगताप

शिरूरच्या विजयासाठी भाजपाचा कार्यकर्ता वचनबद्ध – जगताप

भोसरी विधानसभा मतदारसंघातून दुप्पट मताधिक्य मिळणार

पिंपरी :  शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाची बुथ यंत्रणा सज्ज आहे. या मतदारसंघातील सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, मंडल प्रमुख तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व माजी नगरसेवक प्रभागनिहाय बैठका घेऊन महायुतीच्या विजयासाठी नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मतदान होईल, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी-भाजपा-शिवसेना-आरपीआय-मनसे-रासपा महायुतीचे उमेदवार शिवाजीरावदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार  शिवाजीरावदादा आढळराव पाटील, आमदार महेशदादा लांडगे, माजी महापौर  राहुल जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती नितीन लांडगे, भाजपाचे प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेशजी पिल्ले, भाजपा जिल्हा सरचिटणीस  विलास मडिगेरी, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, विजय फुगे, भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख  विकास डोळस, शिवसेनेचे नेते इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, भाजपाचे मंडल अध्यक्ष रवि नांदुरकर, संतोष तापकीर, रामदास कुटे, मंडल प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महायुतीचे नेते व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले, “नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक विकासाचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. गेल्या १० वर्षांच्या काळात देशाच्या विकासाने पकडलेली गती कायम राखण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुती विजयी होणे आवश्यक आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सुज्ञ मतदारांनी यावेळीही सर्वांगिण विकासाचा विश्वास देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणजेच महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा चंग बांधला आहे. भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणे ही या देशाची गरज असल्याचे मतदारांच्याही लक्षात आलेले आहे. त्यामुळे महायुतीच्या विजयासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
21.1 ° C
21.1 °
21.1 °
78 %
0kmh
0 %
Tue
26 °
Wed
33 °
Thu
33 °
Fri
33 °
Sat
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!