सोलापूर- संविधान बदलणार आणि आरक्षण संपवणार, असा खोटा आरोप आमच्यावर इंडिया आघाडीकडून केला जातो. आज बाबासाहेब आंबेडकरही आरक्षण संपवू शकणार नाहीत. मोदींचा तर सवालच नाही. मोदीकडे आज जेवढे पाहिजे तेवढे मतदान आहे. पण तो रस्ता आम्हाला मान्य नाही. शेकडो वर्षे ज्यांच्यावर अन्याय झाला. आमच्या पूर्वजांकडून पाप झाले असेल. माझ्यासाठी ही प्रायश्चित घेण्याची वेळ आहे, त्यामुळे आरक्षणासाठी जेवढी ताकद देता येईल, तेवढी ताकद देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या सभेत बोलताना दिला. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी सोलापूरमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेसने आंबेडकरांची राज्य घटना जम्मू काश्मीरमध्ये लागू होऊ दिली नाही. आम्ही 370 कलम हटवून ती त्या ठिकाणी लागू केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एससी, एसटी, ओबीसीचे आमदार आणि खासदार भाजपमधून झाले आहेत. इंडिया आघाडीचे लोक ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली धूळफेक करीत आहेत. इंडिया आघाडीचे लोक मला रोज शिव्या देतात. त्यांच्याकडे देशासाठीचे व्हिजनच नाही. आमच्याकडे ते व्हिजन आहे. काँग्रेसवाल्यांनी एससी एसटी आणि ओबीसी वर्गाची फसवणूक केली आहे, असा आरोपही मोदी यांनी केला.
संविधान बदलणार आणि आरक्षण संपवणार, असा खोटा आरोप – पंतप्रधान मोदी
आमच्या पूर्वजांकडून पाप झाले असेल, पण माझ्यासाठी ही प्रायश्चित घेण्याची वेळ
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
27.4
°
C
27.4
°
27.4
°
32 %
4.2kmh
0 %
Thu
30
°
Fri
31
°
Sat
33
°
Sun
33
°
Mon
33
°