34.5 C
New Delhi
Sunday, July 6, 2025
Homeताज्या बातम्याएका वर्षात एक पंतप्रधान हा काँग्रेसचा फॉर्म्युला

एका वर्षात एक पंतप्रधान हा काँग्रेसचा फॉर्म्युला

आशीर्वाद मागण्यासाठी आलोय- पीएम मोदी

सोलापूर- एका वर्षात एक पंतप्रधान हा काँग्रेसचा फॉर्म्युला असल्याची टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे, ते सोलापूर येथील होम मैदान येथे प्रचार सभेत बोलताना केली. सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते तर माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभरात मी सोलापूरमध्ये दोन वेळा आलो आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच मी सोलापूरकरांसाठी काही तरी देण्यासाठी आलो होतो. आता मात्र मी तुम्हाला काही तरी मागण्यासाठी आलो आहे. मला सोलापूरकरांचे आशीर्वाद हवे आहेत, अशी भावनिक साद पीएम मोदींनी सोलापूर येथील सभेवेळी घातली. सोलापूर येथील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी सोलापुरातील प्रचार सभेला राम कृष्ण हरी म्हणत सुरुवात केली. सभेची सुरुवात मराठीत करून त्यांनी सर्वांची मने जिंकली.
एका वर्षात एक पंतप्रधान हा काँग्रेसचा फॉर्म्युला आहे. त्याचेच नियोजन आता हे करत आहेत. देशावर पाच वर्षांत पाच पंतप्रधान थोपवण्याच्या तयारीत आहेत. हे लोकांना सहन होणार नाही. भाजपवरील राग काँग्रेस सरकार जनतेवर काढत असल्याचा आरोप या वेळी त्यांनी काँग्रेसवर केला.
या वेळी एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले. या समुदायांच्या आरक्षणाला जितकी ताकद देता येईल तितकी ताकद देणार. या समुदायांचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव आहे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनोगत व्यक्त करत, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. आमदार राम सातपुते या ऊसतोड कामगाराच्या मुलाला विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
34.5 ° C
34.5 °
34.5 °
54 %
1.4kmh
10 %
Sun
34 °
Mon
35 °
Tue
37 °
Wed
32 °
Thu
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!