पुणे : एमटीव्ही ( MTV ) रोडीज डबल क्रॉस ऑडिशनचा अंतिम टप्पा पुण्यात सुरू झाला, ज्यामध्ये महत्त्वाकांक्षी रोडीजना या लोकप्रिय शोमध्ये सहभागी होण्याची एक शेवटची संधी मिळाली. उत्साहाला उधाण आलेल्या या शहरात रोडीज इतिहासाचा भाग बनण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने त्यात भाग घेतला.हा उत्साह आणखी चेतवण्यासाठी एमटीव्ही ( MTV ) रोडीज डबल क्रॉसने रोटरी क्लबच्या सहयोगाने एक हाय-ऑक्टेन बाइक रॅली योजून पुणे झळकवून सोडले. यामध्ये ७० पेक्षा जास्त उत्साही बाइकर्सने भाग घेतला. ही विशाल रॅली विखे पाटील पब्लिक स्कूलजवळून सुरू झाली आणि पुण्याचे रस्ते दणाणून सोडत नदी पात्र घाटावर समाप्त झाली. या रोमांचक राइडने ऊर्जेने सळसळणाऱ्या पुणे ऑडिशनसाठी अगदी योग्य मंच तयार केला आणि पुणेकरांच्या मनात आगामी कार्यक्रमासाठीची उत्कंठा वाढवली.
या दिवसाचा समारोप एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल येथे एका मस्त फॅन मीट अँड ग्रीट कार्यक्रमाने झाला. येथे काही भाग्यवान चाहत्यांना आतल्या लोकांना भेटण्याची आणि ऑडिशनसाठी आपली अस्सल रोडीज वृत्ती दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यांना ‘जंप द क्यू’ पास देण्यात आले. रोडीज फीव्हर शिगेला पोहोचला आणि प्रत्येक उपक्रमाने महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरावणाऱ्या पुण्यावर एक अविस्मरणीय छाप सोडली, ज्यामुळे ऑडिशनसाठी खूप गर्दी झाली.
होस्ट रणविजयने गॅंग लीडर प्रिन्स, नेहा, रिया आणि एल्विश यांच्यासह निशिगंधा लॉन्स अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे ऑडिशनची सुरुवात केली. या ऑडिशनमध्ये या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी २५०० पेक्षा जास्त रोडीज उमेदवार सामील झाले. पुणे ऑडिशनच्या समापनानंतर आता नवीन चेहरे, प्रतिभावान स्पर्धक यांच्यासह मनोरंजक सीझनची सुरुवात होईल.