30.2 C
New Delhi
Thursday, July 31, 2025
HomeBlogराष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन

राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन

प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी,- पिंपरी मतदार संघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन बुधवारी दापोडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यानंतर आ. बनसोडे यांच्या प्रचारार्थ दापोडीत भव्य प्रचार फेरी काढण्यात आली.
बुधवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने व महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पिंपरी विधानसभेचा जाहीरनामा ऑनलाइन पद्धतीने प्रकाशित करण्यात आला.
त्यानंतर पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतिचे अधिकृत उमेदवार आ. अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ फिरंगाई देवीचे दर्शन घेऊन दापोडी गावातून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली.
प्रचार फेरी सिद्धार्थ नगर, नरवीर तानाजी पुतळा, पवार वस्ती, एसएमएस कॉलनी, आतार वीटभट्टी, महाविहार, काचीवाडा, फुलेनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, खालची आळी विठ्ठल मंदिर,समर्थ व्यायाम शाळा, शिवम मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, वरची आळी विठ्ठल मंदिर, ११ नंबर बस स्टॉप, मंत्री कॉम्प्लेक्स, सुंदर बाग, गणेश गार्डन या मार्गाने प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत आमदार अण्णा बनसोडे, आरपीआय आठवले गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, महायुतीचे समन्वयक भाजपचे नेते सदाशिव खाडे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, ज्येष्ठ नेते उमेश चांदगुडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर कांबळे, नेते नंदू कदम, माजी उपमहापौर केशव घोळवे, राष्ट्रवादी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शेखर काटे, माजी नगरसेवक अविनाश काटे, संतोष कुदळे, संजय काटे, माई काटे, वैशाली काळभोर, सुजाता पालांडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, शिवसेनेचे नेते इरफान सय्यद, सरिता साने, कष्टकरी कामगार नेते बाबा कांबळे, संदीपान झोंबाडे, तसेच महायुतीचे कार्यकर्ते सीमा बोरसे, सीमा चव्हाण, वैशाली वाखारे, सोनाली सायकर, प्रतिभा जवळकर, जयश्री नवगिरे, अश्विनी कांबळे, अश्विनी पोळ, आशा शिंदे, सविता धुमाळ, कविता खराडे तसेच यशवंत कोळेकर, रामदास भांडे, उमेश तांबोळी आदी सहभागी झाले होते.

चौकट – जाहीरनाम्यातील आश्वासने – संपूर्ण मतदारसंघात मेट्रोचे जाळे, चाकण, तळवडे व हिंजवडी परिसर जोडणारा मेट्रो मार्ग उभारणे,
*विधानसभा क्षेत्रातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन
*वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याचे नियोजन
*वल्लभनगर एसटी स्टँड चा पुनर्विकास
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर थीम पार्क
*शहरात अंडरवॉटर जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारणे
*मतदार संघातील पाच रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण
*अपंग निराधार वृद्ध यांच्यासाठी शहरांमध्ये होम स्टे
*जनसंपर्क कार्यालयात २४/७ टोल फ्री कॉल सेंटरची उभारणी
*पिंपरी येथे माता रमाई स्मारक
*निगडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक पिंपरी गावात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणे*हाफकीन संस्थेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजनेची उभारणी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
30.2 ° C
30.2 °
30.2 °
68 %
2.7kmh
99 %
Thu
31 °
Fri
34 °
Sat
36 °
Sun
37 °
Mon
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!