26.1 C
New Delhi
Friday, April 3, 2026
HomeBlog'आयुष-विकसित भारत महावर्ल्ड एक्स्पो’चे ...

‘आयुष-विकसित भारत महावर्ल्ड एक्स्पो’चे १८ ते २० फेब्रुवारीला पुण्यात आयोजन

डॉ. जोसेफ डायस व डॉ. अनिता कोल्हे यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या आयुष संचालनालयाच्या सहकार्याने ट्रिनिटी ग्रुप व चेंबर फॉर इम्पोर्ट, एक्स्पोर्ट अँड हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसीय ‘आयुष-विकसित भारत महावर्ल्ड एक्स्पो २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये होणारा हा एक्स्पो पुणेकरांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत विनामूल्य खुला राहणार आहे, अशी माहिती संयोजक आणि ट्रिनिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. जोसेफ डायस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आयुष संचालनालयाच्या सहसंचालक डॉ. अनिता कोल्हे, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य हेमलता जळगावकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ आयुर्वेद व रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ. मीनल लाड, भारती विद्यापीठ आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश देशपांडे, टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या समन्वयिका डॉ. अपूर्वा संगोराम, झेडव्हीएम युनानी कॉलेजच्या विभागप्रमुख डॉ. फराह शिकलगार, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद रुग्णालयाच्या डॉ. स्नेहल पानसरे यांच्यासह पुण्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.

डॉ. जोसेफ डायस म्हणाले, “या एक्स्पोमध्ये आयुष, अन्न, ऊर्जा, ऑर्गॅनिक उत्पादने, पर्यटन आदी क्षेत्रांचा समावेश असून, विविध राज्यांतील प्रदर्शक, शासकीय संस्था व खासगी उद्योग सहभागी होणार आहेत. हा उपक्रम जनजागृती आणि व्यावसायिक संधी यांचा संगम ठरेल. ‘विकसित भारत’ या व्यापक संकल्पनेनुसार स्वदेशी आरोग्य पद्धती, शाश्वत जीवनशैली आणि व्यापार संधी यांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. एक्स्पोमध्ये विविध उत्पादने, प्रात्यक्षिके, विशेष सवलतीत विक्री तसेच उद्योग, वितरक व आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आयुष व संबंधित क्षेत्रांच्या प्रसारासाठी योगदान दिल्याबद्दल विविध संस्थांचे प्राचार्य, विश्वस्त व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना ‘व्हॅल्युएबल कॉन्ट्रिब्युशन्स अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार “

“पदर्शनात पुण्यातील विविध महाविद्यालये व रुग्णालये सहभागी होणार आहेत. याठिकाणी ओपीडी, वैद्यकीय सल्ला, तपासण्या तसेच १६ हून अधिक आरोग्यविषयक विषयांवर तज्ज्ञ व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. मधुमेह, थायरॉइड, कर्करोग, मणक्याचे आजार, त्वचारोग, स्थूलता, ताणतणाव, हृदयरोग, डोळे-कान-नाक-घसा विकार, महिला व बालआरोग्य, ऑटोइम्यून विकार तसेच योग व पंचकर्म उपचारांबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे,” असे डॉ. अनिता कोल्हे म्हणाल्या.

टिळक आयुर्वेद महाविद्यालय, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय, भारती विद्यापीठ आयुर्वेद महाविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद संशोधन केंद्र, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ आयुर्वेद व रिसर्च सेंटर, धोंडूमामा साठे होमीयोपॅथीक महाविद्यालय, भारतीय संस्कृती दर्शन संस्थेचे आयुर्वेद महाविद्यालय वाघोली, झेडव्हीएम युनानी कॉलेज आदींसह आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी महाविद्यालयांचा सहभाग असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
26.1 ° C
26.1 °
26.1 °
53 %
3.1kmh
75 %
Fri
27 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
34 °
Tue
35 °

Most Popular

Recent Comments