पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इमारतीवर तिरंग्याची झळाळी, आकर्षक विद्युत रोषणाईने उजळलेले रस्ते, आणि मनामनांत देशभक्तीची ज्वाला… अशा उत्साहमय वातावरणात पिंपरी चिंचवड शहर आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

केशरी, पांढरा आणि हिरव्या प्रकाशाचा मोहक संगम जणू स्वातंत्र्याच्या इतिहासातील प्रत्येक पान उजळवत आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून उड्डाणपूलांपर्यंत, आणि उद्यानांपासून ऐतिहासिक वास्तूंपर्यंत सर्वत्र तिरंगामय तेज पसरले आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीसह शहरातील विविध ऐतिहासिक वास्तू, उड्डाणपूल, शासकीय इमारती आदी ठिकाणी आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाईने करण्यात आली आहे.