पुणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून काँग्रेस पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत कसबा मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या माजी महापौर कमल व्यवहारे नाराज झाल्या असून त्यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानं काँग्रेस पक्षाला पुण्यात मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. पुणे शहराच्या पहिल्या महिला महापौर असलेल्या कमल व्यवहारे काँग्रेसमधून बंडखोरी करून कसबा विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. स्वराज्य पक्षात प्रवेश करून त्या सोमवारी (दि. २८) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कमल व्यवहारे या स्वराज्य पक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना, प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या परिवर्तन महाशक्ती च्या उमेदवार असतील.
कॉंग्रेसला मोठा धक्का
पहिल्या महापौर कमल व्यवहारेंचा स्वराज्य पक्षात प्रवेश
RELATED ARTICLES
New Delhi
mist
27.1
°
C
27.1
°
27.1
°
89 %
1.5kmh
40 %
Fri
34
°
Sat
38
°
Sun
38
°
Mon
38
°
Tue
38
°