23.1 C
New Delhi
Sunday, November 3, 2024
HomeMaharastra Election Updatesहजारो चिंचवडकरांच्या साक्षीने अरुण पवार यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

हजारो चिंचवडकरांच्या साक्षीने अरुण पवार यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

संभाजी ब्रिगेड, छावा मराठा युवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, छावा संघटनेचा अरुण पवार यांना पाठिंबा

चिंचवड, – हजारो चिंचवडकराच्या साक्षीने सामाजिक कार्यकर्ते तथा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी व समर्थक अरुण पवार यांनी भव्य रॅली द्वारे शक्तीप्रदर्शन करीत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, वाढती बेरोजगारी, वाहतूक कोंडी, नदी प्रदूषण या महत्त्वाच्या समस्या सोडविणार असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले.
अरुण पवार यांनी पिंपळे गुरव येथील निवासस्थानापासून कार्यकर्त्यांसमवेत जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी गाव, काळेवाडी, थेरगाव अशी दुचाकी भव्य रॅली काढत ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे अर्ज सादर केला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा.गंगाधर बनबरे, छावा मराठा युवा मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, मनोज गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, शहराध्यक्ष प्रवीण कदम, धारूरचे सरपंच बालाजी पवार, प्रकाश इंगोले, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता शिंदे, युवराज माने, किशोर अट्टरगेकर, संजय जाधव आदी उपस्थित होते.


मराठा आरक्षण लढ्यात अरुण पवार यांचा सक्रिय सहभाग असून, चिंचवड विधानसभा मतदारसंघात मनोज दादा जरांगे पाटील पॅटर्न नक्कीच चालणार आहे. अरुण पवार यांना निवडून आणायचेच असा चंग मराठवाड्यातील चिंचवडकर रहिवाशांनी बांधला आहे. अरुण पवार यांनी अर्ज दाखल केल्याने चिंचवड मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून गेली तीन दशकापासून अरुण पवार यांनी चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्य उभे केलेले आहे. सामाजिक नाळ जपत त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. याचबरोबर पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन केले आहे. तसेच लाखाहून अधिक नागरिकांना वृक्ष रोपांचे वाटप केले आहे.
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अरुण पवार म्हणाले, की सर्वच घटकांचा विकास करण्यासाठी मी या लढाईत उतरलो आहे. सर्वसामान्य नागरिक मतदारासह समाजातील सर्व समाज घटकांचा उत्स्फूर्त पाठींबा मिळत आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे यांनी सांगितले, की पिंपरी-चिंचवड शहरातील गतिमान विकास करण्यासाठी, तसेच नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपल्यातीलच एक सामान्य माणूस चिंचवड विधानसभा निवडणुकीत उतरत आहे. आम्ही सर्व अरुण पवार यांच्यासोबत असून, त्यांना मताधिक्याने आमदार करण्यासाठी पुढाकार घेऊन काम करणार असल्याचे सुनीता शिंदे यांनी सांगितले.


संविधानिक लोकशाहीच्या रक्षणासाठी चिंचवड विधानसभेवर अरुण पवार यांनाच निवडून आणण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, संभाजी ब्रिगेड, छावा मराठा युवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, छावा संघटना यांचा पाठींबा अरुण पवार यांना देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
64 %
0kmh
0 %
Sun
28 °
Mon
33 °
Tue
33 °
Wed
33 °
Thu
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!