सांगोला- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी सांगोला तालुक्यात अजित पावरांना हा मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभेचे जागावाटप सुरु असताना साळुंखे यांचा ठाकरे गटात प्रवेश झाल्याने त्यांना आता सांगोला विधानसभेची उमेदवारी मिळणार का? असा सवला उपस्थित केला जातो. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रक्षप्रवेश झाला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, दसऱ्यानंतर पहिल्यांदाच मी समोर आलो आहे. मधल्या काळत हॉस्पिटलची वारी केली. आराम करायचा किती? हराम्यांना घालवायचं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुहूर्त चांगला लागलाय. मशाल कशी पेटवायची आणि कोणाकोणाला चटके द्यायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. आजपासून संपूर्ण मतदारसंघात मशाल पोहोचवा असेही ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापने सांगोल्याच्या जागेवर दावा केला आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख हे या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळं जर महाविकास आघाडीकडून दीपक साळुंखे पाटील यांनी उमेदवारी मिळाली तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. बाबासाहेब देशमुख हे अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
यावेळी ठाकरे गटाचे संजय राऊत म्हणाले, संगोल्याच्या गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून हातात मशाल घेऊन आपले दीपक आबा विजयी होणार. ज्या एका गद्दाराला महाराष्ट्रातील झाडी डोंगर दिसले नाही आणि दुसऱ्या राज्यातले झाडे डोंगर दिसले त्या झाडाच्या मुळाखाली त्याला गाडायचे आहे. आबा कार्यक्रम फिट करण्यासाठी आलेत. आपल्यासारखा माणूस शिवसेनेत आला तुम्ही उद्धवजींचे हात बळकट करण्याचे निर्णय घेतला आहे. खात्री आहे की आबा आणि चाहत्यांना आणि संगोल्याला गर्व वाटेल असे निर्णय उध्दव ठाकरे घेतील. ते आमदार म्हणून विजय होतील आणि नेतृत्व मंडळात त्यांना संधी मिळेल असेही राऊत म्हणाले.