नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक एक टप्प्यांत पार पडणार आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक आयोगाची आज राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. निवडणुकीची घोषणा होताक्षणी आचारसंहिता लागू झाली आहे. खरंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक हरयाणासोबत होणं अपेक्षित होतं. मात्र, जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचं व सण-उत्सवांचं कारण देत निवडणूक आयोगानं महाराष्ट्राची निवडणूक हरयाणासोबत घेणं टाळलं होतं.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर
उमेदवार अर्ज छाननी – ३० ऑक्टोबर
उमेदवार अर्ज मागे घेण्याची तारीख – ४ नोव्हेंबर
मतदानाची तारीख – २० नोव्हेंबर
निकालाची तारीख – २३ नोव्हेंबर
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक यावेळी अनेकार्थांनी वेगळी आहे. यावेळी प्रथमच सहा प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. त्यात भाजप, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे छोटे पक्षही आपली ताकद दाखवणार आहेत. महाराष्ट्रातील दोन बलाढ्य पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगानं मूळ पक्ष कोणाचे हा निर्णय दिला असला तरी जनतेच्या मनात काय आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. हाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुकीचे बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यासाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे आता राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या वेळी, म्हणजे 2019 मध्ये, 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात सर्व 288 जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत सुमारे 61.4 टक्के मतदान झाले. यासोबतच २४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. गेल्या वेळी एकूण पात्र मतदारांची संख्या 8 कोटी 95 लाखांहून अधिक होती. मात्र, हा आकडाही वाढला आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजप आणि अविभाजित शिवसेनेने एकत्रितपणे लढवली होती.