18.1 C
New Delhi
Thursday, November 21, 2024
HomeMaharastra Election Updatesयंदाही कसबा आम्हीच जिंकणार - रवींद्र धंगेकर

यंदाही कसबा आम्हीच जिंकणार – रवींद्र धंगेकर

गणरायाचा आशीर्वाद घेत आपल्या उमेदवारीचा अर्ज श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे दाखल केला.

पुणे- कसबा हा कुणाचाच गड नाही तर कसबा हा केवळ जनतेचा गड आहे. यंदाही कसबा आम्हीच जिंकणार असा विश्वास महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला. माझ्या विरोधात भाजप संपूर्ण ताकद वापरत आहेत पण जनता माझ्या बाजूने असल्याने विजय माझा निश्चित आहे, असे त्यांनी सांगितले. विरोधक अपप्रचाराची खेळी करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र जनता त्यांचा डाव हाणून पाडणार असेही यावेळी त्यांनी नमूद केले. श्री कसबा गणपतीचे आशीर्वाद घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांनी पत्नीसह मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती करून गणरायाचा आशीर्वाद घेत आपल्या उमेदवारीचा अर्ज श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे दाखल केला.श्री कसबा गणपतीची आरती करून व आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली काढण्यात आली. लाल महालातील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला. यावेळी काढलेल्या रॅलीत नागरिक, कार्यकर्ते व महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तरुणाई बरोबरच महिला व ज्येष्ठांनी रॅलीत सहभाग घेतला. रवींद्र धंगेकर यांचा विजय असो, असा जयघोष करण्यात आला.काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहित टिळक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी खासदार वंदना चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, अण्णा थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे आदि प्रमुख नेते सहभागी झाले होते. या बरोबरच कसबा ब्लॉक अध्यक्ष अक्षय माने, नेहरू स्टेडियम ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, भाग 16चे अध्यक्ष मयूर भोकरे, भाग 15चे अध्यक्ष महेश हराळे, शिवराज भोकरे, गणेश शेडगे, कसबा महिला ब्लॉक अध्यक्ष गीता तारू, सोना ओव्हाळ, युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सौरभ अमराळे, संदीप अतपालकर, साहिल राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कसबा मतदार संघाचे अध्यक्ष गणेश नलावडे, दीपक जगताप, अजिंक्य पालकर, भाई कात्रे, संजय गायकवाड, बाळासाहेब ढमाले, सारिका पारेख, निलेश मोरे, दीपक पोकळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कसबा विभाग प्रमुख चंदन साळुंखे, जावेद खान, राजेंद्र शिंदे, रुपेश पवार, संदीप गायकवाड, उमेश गालींदे, हनुमंत दगडे, बाळासाहेब गरूड, अरविंद दाभोळकर, गौरव सिन्नरकर, निलेश पवार, पारेख खांडके, निकिता मारडकर, स्वाती कथलकर आदि प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी, रवींद्र धंगेकर यांचे महिलांकडून होणारे औक्षण व रवींद्र धंगेकर यांचा विजय असो अशा घोषणा देत नागरिकांनी मोठा प्रतिसाद धंगेकर यांना दिला.कसब्याच्या नागरिकांच्या मनातला आमदार, सर्वसामान्यांचा चेहरा, 24 तास जनसेवेसाठी उपलब्ध असणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता.श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत गणरायाची आरती करून धंगेकर यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.छत्रपती शिवाजी मार्गाने पुढे जात असताना चौकात चौकातील गणेश मंडळांकडून धंगेकर यांचे स्वागत करण्यात येत होते. कार्यकर्त्यांना पाणी शरबत नागरिक देत होते. तिन्ही पक्षाचे झेंडे कार्यकर्ते हाती घेऊन धंगेकर यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. रवींद्र धंगेकर विक्रमी मताधिक्याने निवडून येतील हे आजच्या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादामुळे सिद्ध झाले आहे, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
18.1 ° C
18.1 °
18.1 °
59 %
0kmh
0 %
Thu
23 °
Fri
27 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!