पुणे -शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी “हडपसर विधानसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला मिळाला असून, या मतदारसंघातून माजी आमदार महादेव बाबर हे उमेदवार असतील,’ असे सांगितले आहे. त्यावरून या दोन्ही पक्षांत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आले असतानाच पुण्यात आघाडीत शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस- शरदचंद्र पवार यांच्यात जागा वाटपावरून वादाची शक्यता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागा वाटपाच्या प्राथमिक सूत्रात “ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार, ती जागा त्याची’ यानुसार जागांचे वाटप होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे हडपसरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार असल्याने पवार गटाकडून या जागेवर दावा करण्यात आला आहे. पण, ठाकरे गटाच्या नेत्यांनी थेट उमेदवाराचे नावच जाहीर केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
माध्यमांशी बोलताना अंधारे म्हणाल्या, “महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये कोणताही मनमुठाव नाही. सर्वच जागांवरती आता एकमत होत आले आहे. हडपसरची जागा देखील क्लिअर झाली आहे. फक्त पंधरा ते अठरा जागांवर आता चर्चा सुरू आहे.त्यामध्ये मुंबईतील कुलाबा, शिवडी, तसेच श्रीगोंदा का पारनेर, मुखेड, तुळजापूर की औसा, अशा १५ ते १८ जागांचा पेच अद्याप सुटलेला नाही.
यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. तसेच जागा वाटपामध्ये हडपसरची जागा ही शिवसेनेची असून त्या जागेवर महादेव बाबर हे निवडणूक लढवतील.’महाविकास आघाडीच्या जागांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर जागावाटप जाहीर होईल. त्यानंतर उमेदवार निश्चित होईल. तसेच वरिष्ठ नेते ते जाहीर करतील.
त्या नेत्यांचे अधिकार आपल्याकडे असल्याचे कुणीही भासविण्याचा प्रयत्न करू नये. हे निर्णय प्रलंबित आहेत. त्यामुळे जागा वाटपावरून आघाडीत मिठाचा खडा पडेल, असे वक्तव्य कोणीही करू नये.राष्ट्रवादी काॅंग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष, प्रशांत जगताप,