पंढरपूर :- चैत्री यात्रेनिमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, श्री.संत तुकाराम भवन व श्री.संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. श्री च्या गाभा-यावरील कळसास रोषणाई करण्यात आली असल्याने, भाविक कळस दर्शना बरोबर विद्युत रोषणाईचा आनंद घेत आहेत. संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला आहे. सदरची विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती मार्फत करण्यात आली असून, याची जबाबदारी विभाग प्रमुख शंकर मदने यांना देण्यात आली आहे. यासाठी एलईडी माळा, लटकन, तोरणे, रोप लाईट, आर्टीकल, व्हाईट व वॉर्म फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे. तसेच सुरक्षतेच्या दृष्टीने देखील अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आलेल्या आहेत.