24.9 C
New Delhi
Wednesday, March 11, 2026
HomeTop Five Newsभाजपची १०० उमेदवारांची पहिली यादी तयार

भाजपची १०० उमेदवारांची पहिली यादी तयार

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची पहिली उमेदवार यादी जवळपास निश्चित झाली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत १०० पेक्षा अधिक उमेदवारांच्या नावांवर एकमत झाले असून, ४० ते ५० जागांबाबत मात्र अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. या जागांवरील उमेदवारांची नावे प्रदेश पातळीवरील नेतृत्वाकडे पाठविण्यात येणार असून, तेथे अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

भाजपच्या कोअर कमिटीने मान्यता दिलेली पहिली यादी गुरुवारी (२५ डिसेंबर) प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असून, ही यादी शुक्रवारी (२६ डिसेंबर) अधिकृतपणे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिवसेना (शिंदे) पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून शहरातील ३४ जागांची मागणी करण्यात आली असून, भाजपकडून मात्र इतक्या जागा देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भाजपने शिवसेना (शिंदे) पक्षाला पुणे महापालिकेत १६ जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.


जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने यासंदर्भातील अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील, असा तोडगा काढण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेत एकहाती सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने भाजपकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
24.9 ° C
24.9 °
24.9 °
15 %
1.5kmh
50 %
Wed
37 °
Thu
37 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
34 °

Most Popular

Recent Comments