20.1 C
New Delhi
Wednesday, October 29, 2025
HomeTop Five Newsआषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी

आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी

टोकन दर्शन व्यवस्था व मंदिर जतन संवर्धन कामाबाबत जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक

  • वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी चैत्री यात्रेत आवश्यक नियोजन.

पंढरपूर :- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्याची आषाढी यात्रेपूर्वी ashadhi wari टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी घेण्याबाबत तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी vithal rukamini मंदिर जतन व संवर्धन् कामाबाबत पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस सदस्या शकुंतलाताई नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड. माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा तसेच वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन संवर्धन कामाचे ठेकेदार रमेश येवले तसेच टिसीएस कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर भीमा सेखर व विविध खात्याचे खाते प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत मंदिर जतन व संवर्धन कामाचा आढावा घेण्यात आला, त्यामध्ये सध्या गाभारा, बाजीराव पडसाळी, सभामंडप व इतर अनुषंगीक ठिकाणी सुरू असलेली सर्व कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करून घेण्यात येणार असून, दगडी कामास कोटींग करणे व वॉटरप्रुफींगची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. याशिवाय, श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्यांचा आषाढी यात्रेपूर्वी चाचणी घेण्यासाठी व मंदिर समितीचे कार्यालयीन कामकाज गतीमान करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या संगणक प्रणाली सेवाभावी तत्वावर मोफत उपलब्ध करून देण्याची मंदिर समितीची विनंती टिसीएस कंपनीने मान्य केली आहे. त्यामध्ये ऑनलाईन डोनेशन, भक्तनिवास बुकींग, पुजा बुकींग, लाईव्ह दर्शन व इतर अनुषंगीक बाबींसाठी संगणक प्रणालीचा समावेश आहे. इत्यादीबाबत निर्णय घेण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी सांगीतले

प्रतिवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी दिवशी चैत्री यात्रा भरते. यावर्षी चैत्री एकादशी दिनांक 4 एप्रिलला संपन्न होत असून, यात्रेचा कालावधीत दिनांक 2 ते 12 एप्रिल असा आहे. या यात्रा नियोजनाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये या यात्रेला येणा-या भाविकांना आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगीतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
20.1 ° C
20.1 °
20.1 °
83 %
0kmh
75 %
Wed
31 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
33 °
Sun
31 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!