29.1 C
New Delhi
Tuesday, March 18, 2025
HomeTop Five Newsसैफ अली खानवर चाकू हल्ला

सैफ अली खानवर चाकू हल्ला

मुंबई-  बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर karina kapoor यांच्या वांद्रे पश्चिमयेथील घरात गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरी झाली. चोरीदरम्यान सैफ अली saif alikhan खानवर चोरट्याने चाकूने हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला असून त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  ही घटना गुरुवारी पहाटे २:३० च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार चोरट्याशी झालेल्या झटापटीत अभिनेता सैफ अली खानवर चाकूने वार करण्यात आले. यात सैफ अली खान जखमी झाला आहे. त्याला किती मार लागला हे  समजू शकलेले नाही. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वांद्रे पोलिसांनी एफआयआर fir दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. करीना कपूर आणि तिची मुले सुखरूप आहेत. कुटुंबीयांनी अद्याप या घटनेबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिलेले नाही. प्राथमिक तपासानंतर पोलीस लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतात. घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

ही घटना घडली तेव्हा अभिनेता सेफ अली खान, करीना आणि कुटुंबातील इतर सदस्य झोपले होते. यावेळी चोरटा घरी शिरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने सैफ अली खानवर चाकूने वार केले. दोघांमध्ये झटापट झाली. मोठा आवाज झाल्यामुळे घरच्यांना जाग आली. यावेळी  चोरट्याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.1 ° C
29.1 °
29.1 °
26 %
4.6kmh
0 %
Tue
32 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
36 °
Sat
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!