मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी ७ हजार ९९५ उमेदवार रिंगणात उतरले असून एकूण १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०१४ पासून लागू झाली. या निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. या अर्जांची छाननी केली जाणार आहे. तसेच ४ नोव्हेंबर २०२४ अर्ज मागे घेण्याची तारीख आहे.
दरम्यान, सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी कंबर कसली असून विधानसभा निवडणुकीसाठी कोणतीही कसर सोडली नाही. महायुती ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची आघाडी आहे. महाविकास आघाडी ही शिवसेना (यूबीटी) (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी (एससीपी) (शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्षाची आघाडी आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ , शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. २०१४ मध्ये भाजपला १२२ , शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी सर्व २८८ जागांसाठी मतमोजणी होणार आहे.
महायुती पूर्ण ताकदीने मैदानात उतरली असून २८८ पैकी २८६ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीने २८६ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, काही जागांवर महायुतीतील मित्र पक्षांना पाठिंबा जाहीर केला आहे.
मानखुर्द-शिवाजी नगर, आष्टी, मोर्शी या जागांवर महायुतीकडून दोन-दोन उमेदवार देण्यात आले आहेत. महायुतीमध्ये भाजपने १५२, शिंदेंच्या शिवसेनेने ८२ तर राष्ट्रवादीने ५५ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीने २८६ मतदारसंघात एकूण २८९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. मात्र शिवडी व मालेगाव मध्य या दोन विधानसभा मतदारसंघात महायुतीने एकही उमेदवार दिलेला नाही.
२८८ जागांसाठी ७ हजार ९९५ उमेदवार रिंगणात
१० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
31.8
°
C
31.8
°
31.8
°
65 %
1.5kmh
97 %
Fri
34
°
Sat
37
°
Sun
39
°
Mon
32
°
Tue
31
°