नवी मुंबई, – नवी मुंबईतील बहुप्रतिक्षित ‘लोकनेते डी. बी. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा’वर भारतातील पहिल्यांदाच वॉटर टॅक्सी(WaterTaxiIndia) सेवा उपलब्ध होणार आहे. (multimodal transport India)या नव्या सुविधेमुळे नवी मुंबई विमानतळ देशातील पहिलं मल्टी-मोडल ट्रान्सपोर्टेशन हब ठरणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हा प्रकल्प सिडको (CIDCO) आणि अदाणी (Adani airport project)ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने PPP मॉडेलवर उभारला जात आहे. येथून जलमार्ग, रेल्वे, रस्ता आणि मेट्रो मार्गांद्वारे थेट विमानतळाशी जोडणी होणार आहे. सौर ऊर्जेचा वापर, शाश्वत शहर नियोजन आणि हरित पायाभूत सुविधांवर आधारित हे विमानतळ भविष्यातील स्मार्ट सिटीचा एक आदर्श उदाहरण ठरणार आहे.
फडणवीस म्हणाले, “या विमानतळाच्या उभारणीमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होईल आणि नवी मुंबई(NaviMumbaiAirport), पनवेल, रायगड परिसरातील आर्थिक घडामोडींना गती मिळेल.”
विमानतळावर विमान दुरुस्ती सुविधा, भव्य पार्किंग व्यवस्था आणि(MultimodalConnectivity) जलवाहतुकीचा सहज पर्याय असेल. यामुळे जागतिक स्तरावरील व्यावसायिक व प्रवासी सोयीसाठी नवा अध्याय सुरु होणार आहे.