नागपूर,- महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून अनेक मान्यवरांनी सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना त्यांच्या दालनात भेट देत शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यासह विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मनिषा कायंदे, निरंजन डावखरे, किरण सरनाईक, तसेच काँग्रेसचे विधानपरिषद आमदार सतेज पाटील आणि अभिजीत वंजारी यांनी सभापती व उपसभापतींशी सौजन्यपूर्ण संवाद साधत हिवाळी अधिवेशनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या भेटींच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांचे कार्यकाळ फलदायी व विधायक ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


