मुंबई- महाविकास आघाडी व महायुतीत जागावाटपावरून काथ्याकूट सुरू असताना वंचितने विधानसभा निवडणुकांच्या तयारीत आघाडी घेतली असून आज १० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या सर्व जागांवर मुस्लीम उमेदवारांना संधी दिली आहे. येत्या आठवडाभरात महाराष्ट्रात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यात मनसेनंतर वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली असून वंचितने १० विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या आघाडीत सामील होणार का? अशी चर्चा होत असतानाच वंचितने आज १० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करत स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीने १० जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात औरंगाबाद मध्य (छत्रपती संभाजीनगर मध्य), कल्याण पश्चिम, परभणी, हडपसर, माण, सांगली, गंगापूर, शिरोळ, मलकापूर, बाळापूर व परभणी या महत्त्वाच्या मतदारसंघाचाही समावेश आहे.
वंचितकडून विधानसभा दुसरी यादी जाहीर
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
22.2
°
C
22.2
°
22.2
°
27 %
4.4kmh
0 %
Wed
23
°
Thu
24
°
Fri
24
°
Sat
26
°
Sun
28
°