28.1 C
New Delhi
Friday, September 19, 2025
HomeTop Five News‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ ला ढोल-ताशांच्या गजरात ऐतिहासिक मानवंदना

‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ ला ढोल-ताशांच्या गजरात ऐतिहासिक मानवंदना

पिंपरी-चिंचवड : मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती शिल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या शिल्पाला लवकरच ढोल-ताशांच्या गजरात ऐतिहासिक मानवंदना दिली जाणार आहे. हा सोहळा १४ सप्टेंबर रोजी दु. ३ वा. संपन्न होणार आहे.

आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पुढाकाराने उभे राहत असलेले हे ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे ठरणार आहे. शिल्पासोबत उभारली जाणारी भव्य ‘‘शंभूसृष्टी’’ शिव-शंभू विचारांना आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाला नवसंजीवनी देणार आहे.

छत्रपती संभाजी महाराजांप्रती असलेल्या अपार श्रद्धा व निष्ठेच्या भावनेतून शिव-शंभू प्रेमींच्या आग्रहाने या शिल्पाला ढोल-ताशांच्या गजरामध्ये अनोखी मानवंदना देण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. या माध्यमातून ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ विषयी जनजागृती व्हावी हा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.

शिव-शंभूंच्या विचारांचा जागर संपूर्ण समाजात व्हावा, या हेतूने ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ला दिली जाणारी ही अनोखी मानवंदना महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
28.1 ° C
28.1 °
28.1 °
83 %
0kmh
40 %
Fri
33 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °
Tue
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!