27.5 C
New Delhi
Friday, October 10, 2025
HomeTop Five Newsस्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपाचे जोरदार शक्तीप्रदर्शन!

स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपाचे जोरदार शक्तीप्रदर्शन!

‘‘विकसित भारत अभियान’’ चे शहरभरात ‘बॅनरबाजी’

  • मंडलनिहाय कार्यक्रम, उपक्रम आणि कार्यकर्त्यांशी संवाद

पिंपरी- चिंचवड –
‘‘विकसित भारत अभियान’’ चा नारा देत देशभरात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस विविध उपक्रम आणि विधायक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा वज्रमूठ दाखवली आणि शहरभरात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. संपूर्ण शहरात पक्षाचे फ्लेक्स लावण्यात आले असून, शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.

भाजपासह तमाम हिंदू बांधवांचे आराध्य प्रभू श्रीराम जन्मोत्सव अर्थात राम नवमी आणि भाजपा स्थापना दिवस एकत्र येण्याचा योग आला. त्यामुळे एका बाजुला श्रीराम यांचा जयघोष आणि दुसऱ्या बाजुला ‘‘अजेय भारत… अजेय भाजपा..’’ असा संकल्प शहरातील भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा दिसला आहे.

भाजपाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे स्थापना दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष व आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाशिव खाडे, माऊली थोरात, कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, जिल्हा सरचिटणीस संजय मंगोडेकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तुषार हिंगे आदी पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेत शहरात फ्लेक्सद्वारे विकसित भारत आणि महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य नोंदणी झाल्याबाबत जनजागृती केली. या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे फोटो झळकले आहेत. तसेच, विविध वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांमध्ये पक्षाच्या जाहीरातीही प्रसिद्ध झाल्या आहेत. आमदार लांडगे यांच्या निवासस्थानी त्यांनी सकाळी ध्वजारोहण केले. त्यानंतर भोसरी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयावर ध्वज फडकावण्यात आला. आगामी निवडणुकांच्या निमित्ताने भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी एकजुट केल्याचे पहायला मिळत आहे.

*
महाराष्ट्रात दीड कोटी सदस्यांचा टप्पा पूर्ण…
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशने सदस्य नोंदणीचा दीड कोटींचा टप्पा नुकताच पार केला. भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांचं हे यश असून याच पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या ४५ व्या स्थापना दिवसानिमित्त ‘मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन’ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच भाजपाचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले, जे आज ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेसह गौरवशाली भारताची पुनर्बांधणी करत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सुमारे ११ कोटी सदस्यांसह जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे.
*

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा मजबूत…
पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीची वाटचाल 2014 पासून सक्षम होवू लागली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यावेळीचा सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट भाजपासोबत गेला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आमदार महेश लांडगे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आणि मोठा गट भाजपात दाखल झाला. परिणामी, 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर ‘‘कमळ’’ फुलले. भाजपाच्या सत्ताकाळात शहरातील अनेक मान्यवरांना मोठी संधी मिळाली. त्यामध्ये सदाशीव खाडे, ॲड. सचिन पटवर्धन, अमित गोरखे, उमा खापरे, अनुप मोरे अशा अनेक नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा बलाढ्य असून, त्या ताकडीने पक्ष संघटना मजबूत होत आहे.
**

“राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” हा भाजपा विचार अंगिकारत, अंत्योदयाच्या मार्गावर भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता अविरत वाटचाल करत आहे. भाजपा स्थापना दिनानिमित्त निवासस्थानी, प्रत्येक मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयसमोर आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचा ध्वज फडकावून हा गौरवाचा दिवस साजरा केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे संघटन मजबूत करीत असून, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि विकसित भारत व शेवटच्या घटकाचा विकास साधणे, असा संकल्प आहे.

  • महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
27.5 ° C
27.5 °
27.5 °
40 %
3.3kmh
0 %
Thu
28 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!