पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४ मध्ये पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात भोसले मार्ग भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, एरंडवण्यातील श्री शनि मारुती बाल गणेश मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील पोटसुळ्या मारुती मंडळाने तृतीय, नवी खडकी येरवडा येथील नवज्योत मित्र मंडळ ट्रस्टने चौथे तर भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १९४ मंडळे व शाळांपैकी १०६ मंडळे व शाळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १४ लाख ९५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांसह सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दिनांक २० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे. पारितोषिक वितरण राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांच्या हस्ते होणार असून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय जगद्गुरु कृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत शिवाजी मित्र मंडळाच्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित सजीव देखाव्याला ५१ हजार रुपयांचे, श्री शनि मारुती बाल गणेश मंडळाच्या दुधाची भेसळ या देखाव्याला ४५ हजारांचे, पोटसुळ्या मारुती मंडळाच्या व्यसनमुक्ती या सजीव देखाव्यास ४० हजारांचे, नवज्योत मित्र मंडळ ट्रस्टच्या नको व्यसन नशेचे तर असावे खेळाचे या देखाव्याला ३५ हजारांचे आणि विनायक नवयुग मित्र मंडळाच्या मी पुस्तक बोलतोय या देखाव्याला ३० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले. यावर्षी जय गणेश भूषण पुरस्कार श्रीकृष्ण तरुण मंडळ कॅम्प यांना देण्यात येणार असून रुपये १ लाखाचे पारितोषिक प्रदान करण्यात येईल.
स्पर्धेच्या परीक्षण मंडळात डॉ.अ.ल.देशमुख, विवेक खटावकर, विजय चव्हाण, मधुकर जिनगरे, सुरेश वरगंटीवार, सतिश मराठे, किशोर सरपोतदार, बापू पोतदार, अविनाश कुलकर्णी, दिगंबर गायकवाड, संदीप शिंदे, विनायक भगत, ओंकार कळढोणकर यांसह सहाय्यक म्हणून बाळू घाटे, अनिरुद्ध दोरगे, निखील कांबळे, ओम खवले, समर्थ चव्हाण, श्री धरमकारे, श्रीपाद एडके, वेदांत वाडेकर यांनी काम पाहिले.
* इतर निकाल :-
१) पश्चिम विभाग :- आझाद हिंद मित्र मंडळ डेक्कन जिमखाना (प्रथम), शिवगर्जना मित्र मंडळ कर्वेनगर (द्वितीय), अखिल जनवाडी सार्व. गणेशोत्सव मंडळ (तृतीय), काल्पनिक देखावे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ (प्रथम), जल्लोष सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ वारजे (द्वितीय). सजीव देखावे – आराधना स्पोटस् क्लब जनवाडी (प्रथम), एकी तरुण मंडळ कोथरुड (द्वितीय), सम्राट मित्र मंडळ कोथरुड डेपो (तृतीय). धार्मिक व पौराणिक देखावे – नवजवान मित्र मंडळ कोथरुड (प्रथम), संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ कोथरुड (द्वितीय). सामाजिक देखावे – वीर लहुजी मित्र मंडळ निरेगळ मठ (प्रथम), मुठेश्वर मित्र मंडळ शास्त्रीनगर (द्वितीय), अजिंक्य मित्र मंडळ मॉडेल कॉलनी (तृतीय).
२) पूर्व विभाग :- नवरंग मित्र मंडळ, हडपसर (प्रथम), भोलेनाथ तरुण मंडळ वैदुवाडी (द्वितीय), उष:काल मित्र मंडळ, संकल्प समाजिक सेवा संस्था हडपसर (तृतीय). सामाजिक – आझाद हिंद मित्र मंडळ ट्रस्ट वडगांव शेरी (प्रथम), पंडित जवाहरलाल नेहरु मार्केट मित्र मंडळ हडपसर (द्वितीय), हनुमान मित्र मंडळ वानवडी (तृतीय). धार्मिक / पौराणिक देखावे – वंदे मातरम मित्र मंडळ मगर आळी (प्रथम), हडपसर कला क्रीडा मंडळ गाडीतळ (द्वितीय). ऐतिहासिक देखावे – जय जवान मंडळ कॅम्प. कलात्मक / काल्पनिक देखावे प्रोत्साहनपर – कन्व्हर्ट स्ट्रीट मित्र मंडळ कॅम्प.
३) उत्तर विभाग :-आदर्श तरुण मंडळ येरवडा (प्रथम), श्री अष्टविनायक मित्र मंडळ विश्रांतवाडी (द्वितीय), जनता नगर मित्र मंडळ येरवडा (तृतीय), सामाजिक देखावे – नटराज मित्र मंडळ नागपूर चाळ (प्रथम), दर्शक तरुण मंडळ येरवडा (द्वितीय), शिवराज मित्र मंडळ येरवडा (तृतीय), धार्मिक/ पौराणिक देखावे – अखिल रामनगर मित्र मंडळ येरवडा (प्रथम), डेपो लाईन मित्र मंडळ खडकी (द्वितीय), चंद्रकोर मित्र मंडळ येरवडा (तृतीय). सजीव देखावे – दि नॅशनल यंग क्लब खडकी (प्रथम), विकास तरुण मंडळ खडकी (द्वितीय), गवळीवाडा तरुण मंडळ ट्रस्ट खडकी बाजार (तृतीय).
४) दक्षिण विभाग :- एकता मित्र मंडळ अरण्येश्वर (प्रथम), वाघजाई मित्र मंडळ फाऊंडेशन जनता वसाहत (द्वितीय), संयुक्त जवान मित्र मंडळ सेनादत्त पेठ (तृतीय). सामाजिक देखावे – शिवशक्ती कबड्डी संघ मित्र मंडळ (प्रथम), युगंधर मित्र मंडळ (द्वितीय), धर्मवीर शंभूराजे मित्र मंडळ कोंढवा खुर्द आणि उदय मित्र मंडळ दत्तवाडी (तृतीय – विभागून). धार्मिक देखावे प्रोत्साहनपर – वीर तानाजी तरुण मित्र मंडळ माणिकबाग. सजीव देखावे – अखिल दत्तवाडी संयुक्त लायन्स क्ल्ब मित्र मंडळ (प्रथम), जयनाथ तरुण मित्र मंडळ धनकवडी (द्वितीय), वनराई कॉलनी मित्र मंडळ धनकवडी (तृतीय). ऐतिहासिक देखावे – शिवराज मित्र मंडळ पर्वती दर्शन (प्रथम), साई मित्र मंडळ आंबेगाव पठार (द्वितीय). काल्पनिक देखावे – सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट सहकारनगर (प्रथम), अखिल नरवीर तानाजी मित्र मंडळ (द्वितीय), जय महाराष्ट्र मित्र मम्डळ धनकवडी (तृतीय). विशेष सामाजिक पुरस्कार – डॉ. मिनू मेहता औद्योगिक संस्था येवलेवाडी.
५) मध्य (उत्तर) विभाग :- गोसावीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोमवार पेठ (प्रथम), काळभैरव तरुण मंडळ गणेश पेठ (द्वितीय), नारायण पेठ माती गणपती ट्रस्ट (तृतीय). सजीव देखावे – व्यवहारआळी चौक मित्र मंडळ कसबा पेठ (प्रथम), श्री नवनीत मित्र मंडळ सदाशिव पेठ (द्वितीय), अपोलो तरुण मंडळ सोमवार पेठ (तृतीय). ऐतिहासिक देखावे – जय जवान समता मित्र मंडळ महात्मा फुले पेठ (प्रथम), आॅस्कर मित्र मंडळ कसबा पेठ. काल्पनिक/ कलात्मक देखावे – श्री गजानन मित्र मंडळ लक्ष्मी रस्ता (प्रथम), सो.क्ष.कासार गणेशोत्सव मंडळ कसबा पेठ (द्वितीय), होनाजी तरुण मंडळ बुधवार पेठ (तृतीय). धार्मिक/ पौराणिक देखावे – त्रिशुंड गणपती विजय मंडळ सोमवार पेठ (प्रथम), श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान कसबा पेठ (द्वितीय), सत्यज्योत मित्र मंडळ सोमवार पेठ (तृतीय). सामाजिक प्रबोधनपर देखावे – मराठा मित्र मंडळ रास्ता पेठ (प्रथम), नगरकर तालीम मंडळ लक्ष्मी रस्ता (द्वितीय).
६) मध्य (दक्षिण) विभाग :- शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट (प्रथम), कडबे आळी तालीम मंडळ शनिवार पेठ (द्वितीय), अष्टविनायक मित्र मंडळ नवी पेठ (तृतीय). धार्मिक/ पौराणिक देखावे – पद्मशाली सम्राट मंडळ भवानी पेठ (प्रथम), आदर्श बाल मित्र मंडळ भवानी पेठ (द्वितीय), गणेश मित्र मंडळ चिंचेची तालीम (तृतीय). सजीव देखावे – नवभारत सेवक मंडळ भवानी पेठ (प्रथम), हिंदमाता तरुण मंडळ नाना पेठ (द्वितीय), जय जवान मित्र मंडळ नाना पेठ (तृतीय). काल्पनिक देखावे – कस्तुरे चौक तरुण मंडळ गणेश पेठ (प्रथम), विकास तरुण मंडळ भवानी पेठ (द्वितीय), विश्रामबाग मित्र मंडळ (तृतीय). सामाजिक प्रबोधनपर देखावे – त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सव (प्रथम), त्रिमूर्ती मित्र मंडळ कसबा पेठ (द्वितीय), शिवांजली मित्र मंडळ नवी पेठ (तृतीय).
७) जय गणेश भूषण पुरस्कार प्राप्त मंडळे सन्मान :- अरण्येश्वर मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, हिंद तरुण मंडळ ट्रस्ट, आदर्श मित्र मंडळ, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर ट्रस्ट.
८) महोत्सवी वर्ष असलेली गणेश मंडळे :- श्री नवचैतन्य मंडळ कॅम्प (७५ वर्ष), सुयोग मित्र मंडळ गोखलेनगर, नरवीर तरुण मंडळ शिवाजीनगर गावठाण (५० वर्षे).
९) दिव्यांग शाळा विभाग :- कामायनी विद्या मंदिर गोखलेनगर, मूकबधिर शिक्षण व संशोधन केंद्र आपटे रस्ता, बालकल्याण संस्था औंध.
१०) शालेय विभाग (पुणे शहर परिसर) :- लोकसेवा इ स्कूल पाषाण (प्रथम), वनाज विद्यामंदिर स्कूल पौड रस्ता (द्वितीय), पेरिविंकल हायस्कूल बाणेर (तृतीय), नूतन बालविकास मंदिर शाळा सदाशिव पेठ (चतुर्थ), विमलाबाई गरवारे प्रशाला डेक्कन जिमखाना (पाचवा), न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शनिवार पेठ, रानडे बालक मंदिर शनिवार पेठ, सुंदरदेवी राठी विद्यालय मित्रमंडळ चौक, हुजूरपागा हायस्कूल कात्रज (उत्तेजनार्थ).
११) बाल मित्र मंडळ :- श्रीराम बाल मित्र मंडळ सोमवार पेठ, अथर्व बाल मित्र मंडळ गुरुवार पेठ.
१२) सोसायटी :- राम सहकारी गृह.र.संस्था मर्या.येरवडा (प्रथम), साईकृपा रेसिडन्सी सांस्कृतिक समिती लोहगाव (द्वितीय), जय शंकर गृ.सं.म. घोले रस्ता (तृतीय), टेÑजर पार्क अपा. कंडोमिनियम सहकारनगर, सदाशिव सोसा. मित्र मंडळ कोथरुड (उत्तेजनार्थ).