भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता ट्रेनचं तिकीट कन्फर्म झालं की नाही हे ट्रेन सुटण्याच्या अवघ्या ४ तासांऐवजी तब्बल २४ तास आधीच कळणार आहे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात वेटिंग लिस्टमुळे प्रवाशांना होणाऱ्या तणावावर तोडगा काढण्यासाठी रेल्वेने ही नविन प्रणाली तयार केली आहे.सध्या तिकीट कन्फर्मेशनसाठी अंतिम चार्ट ट्रेनच्या सुटण्यापूर्वी ४ तास आधी तयार केला जातो. मात्र नव्या प्रणालीमुळे हा चार्ट २४ तास आधीच जारी केला जाईल, ज्यामुळे प्रवाशांना तातडीने प्रवासाच्या इतर पर्यायांचा विचार करण्याची संधी मिळेल.या नव्या प्रणालीची पायलट चाचणी ६ जूनपासून राजस्थानमधील बिकानेर रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आली आहे. सध्या ही व्यवस्था एका ट्रेनपुरती मर्यादित असली तरी त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही आठवड्यांमध्ये आणखी तपासणी व मूल्यांकन केल्यानंतर या प्रणालीचा विस्तार करण्यात येणार आहे.२१ मे रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना बिकानेरमधील रेल्वे अधिकाऱ्यांनी ही प्रणाली सुचवली होती. त्यांनी लगेचच या योजनेस मान्यता दिली आणि त्यानुसार प्रायोगिक अंमलबजावणी सुरू झाली.ही प्रणाली विशेषतः जिथे प्रतीक्षा यादी मोठी असते अशा मार्गांवर अधिक उपयुक्त ठरेल. उदाहरणार्थ – दिल्ली, बिहार, बंगाल आणि मुंबई या मार्गांवर ती तातडीने लागू करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. या नव्या योजनेमुळे कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट कन्फर्म होण्याची धाकधूक आता संपणार आहे.
रेल्वेच्या नव्या नियमानं वेटिंगवाल्यांना मिळणार वेळेवर उत्तर!
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
24.8
°
C
24.8
°
24.8
°
36 %
2.3kmh
0 %
Fri
31
°
Sat
32
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°