20.1 C
New Delhi
Monday, November 10, 2025
HomeTop Five Newsकार्तिकी यात्रा : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर प्रशासन सज्ज- गहिनीनाथ महाराज औसेकर

कार्तिकी यात्रा : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर प्रशासन सज्ज- गहिनीनाथ महाराज औसेकर

सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य

वॉटरप्रुफ दर्शनमंडपाची उभारणी व अन्नछत्र;

2500 कर्मचारी / स्वयंसेवकांची नियुक्ती ;

पंढरपूर – :- कार्तिकी शुध्द एकादशीला म्हणजे दिनांक 02 नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रा संपन्न होत आहे. या दिवशी उपमुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा कालावधी दि.26 ऑक्टोंबर ते 05 नोव्हेंबर असा आहे. या यात्रेला सुमारे 10 ते 12 लाख भविक पंढरपूरात येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर वॉटरप्रुफ ताडपत्री शेड, जादा दर्शन मंडपाची निर्मिती, आपत्कालीन मार्ग, विश्रांती कक्ष, दर्शन रांगेत बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा – खिचडी आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत. यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात आले असून, दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालविण्यासाठी अनुभवी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने रूग्णवाहिका वैद्यकीय पथकासह, प्रथमोपचार केंद्र, स्वयंसेवी संस्थेमार्फत मोफत वैद्यकीय व्यवस्था असणार आहे. याशिवाय, आरोग्य विभागामार्फत श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप व रिध्दी सिध्दी दर्शनमंडप येथे आयसीयु, बाजीराव पडसाळी, सारडा भवन इत्यादी ठिकाणी आरोग्य व्यवस्था असणार आहे. महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष तसेच चंद्रभागा वाळवंट येथे चेंजिंग रूम उभारण्यात येत आहेत. याशिवाय, सोलापूर महानगरपालिका यांचेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचा-यांसह, सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक 125 सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाईल लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सुचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलीसी आदी व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी सांगीतले.

स्वच्छतेसाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून, मंदिर, दर्शनमंडप, तुकाराम भवन येथील स्वच्छता मंदिर कर्मचा-यांमार्फत व नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा इ. ठिकाणची स्वच्छता आऊटसोर्सिंग पध्दतीने करण्यात येत आहेत. या कामी स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येत आहे. दर्शनरांगेत नवमीपासून चहा-शाबुदाणा, तांदळाची खिचडी तसेच रिध्दी सिध्दी दर्शनमंडप येथे दशमी, एकादशी व द्वादशीला अन्नछत्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंदिर समितीचे संकेतस्थळ (www.vitthalrukminimandir.org), मोबाईल अॅप (‘‘श्री.विठ्ठल रूक्मिणी देवस्थान, पंढरपूर’’) वरून श्रीचे लाईव्ह दर्शन उपलब्ध असून पत्राशेड दर्शन रांग व मंदिर परिसरात एल.ई.डी. स्क्रिन बसविण्यात येत आहे. याशिवाय, देणगी घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती, ऑनलाईन देणगीसाठी QR CODE, RTGS, सोने-चांदी वस्तु दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी लाडूप्रसाद व त्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच वेदांता, व्हीडीओकॉन व श्री.विठ्ठल रूक्मिणी या 3 भक्तनिवासामधील 361 रूममध्ये सुमारे 1600 भाविकांची निवास व्यवस्था करण्यात येत आहे.

सदर यात्रा निर्विघ्नपणे – सुरळीत पार पाडण्यासाठी व वारकरी भाविकांना केंद्र बिंदू मानून त्यांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीचे सदस्य सर्वश्री आ.रामचंद्र कदम, शकुंतलाताई नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड.माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे परिश्रम घेत असून सुमारे 2500 कर्मचारी व स्वयंसेवक सेवा पार पाडणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
56 %
0kmh
0 %
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!