20.6 C
New Delhi
Friday, November 7, 2025
HomeTop Five Newsआपत्तीग्रस्त मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात तब्बल 50 गाड्या मदत रवाना!

आपत्तीग्रस्त मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात तब्बल 50 गाड्या मदत रवाना!

आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवडकरांची वज्रमुठ

– भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक पुढाकार

पिंपरी- चिंचवड-
मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यासह अन्य भागातील पूरग्रस्त शेतकरी, कष्टकरी यांना ‘‘एक हात मदतीचा’’ या उद्देशाने पिंपरी-चिंचवडमधून एकाच दिवशी तब्बल 50 गाड्या मदत रवाना झाली. आपत्तीग्रस्त भागातील 100 हून अधिक गावांमधील सुमारे 18 हजार 400 कुटुंबांना ही मदत वितरीत करण्यात येणार आहे. या विधायक उपक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.

हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा उपक्रम हाती घेण्यात आला. लोकसहभागातून तब्बल 50 ट्रक मदत उभारण्यात आली. यामध्ये जीवनाश्यक वस्तु, अन्नधान्याचा समावेश आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, मोशी येथे गाड्यांचे पूजन करण्यात आले आणि मदत मराठवाड्यात रवाना झाली. यावेळी आमदार महेश लांडगे आणि भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी तसेच हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.  मराठवाड्यातील पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचे कीट वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी 50 गाड्या आणि प्रत्येक वाहनासोबत चार ते पाच स्वयंसेवक असे 300 सहकाऱ्यांसह ही मदत रवाना केली आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील भाजपा महायुती सरकारने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज घोषित केले. पुरामुळे आपल्या जीवितहानी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना राज्य सरकारने  4 लाख रुपये अनुकंपा रक्कम देण्याची घोषणा केली आहे. पशु आणि पाळीव प्राण्यांच्या नुकसानाची भरपाई, घरांच्या आणि इमारतींच्या नुकसानाची भरपाई, महायुती सरकारतील मंत्री, विधानसभा आणि लोकसभा सदस्य एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री आपत्ती निवारण कोषात दान करण्याचा निर्णय केला आहे. राज्य सरकार सर्वोतोपरी मदतकार्य करीत आहे. लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात मदतकार्य करीत आहोत. मानवता जपणे ही आपली संस्कृती आहे.

मराठवाड्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्य करणारे पिंपरी-चिंचवडकर यांच्यासह भारतीय जनता पार्टी, विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या माध्यमातून लोकसहभागातून मदत उभी करण्यात आली.
***


महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी आपत्ती आली, तर पिंपरी-चिंचवडकरांना मानवतेच्या दृष्टीकोनातून पुढकार घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती व कोकणातील निसर्ग चक्रीवादळ सारख्या संकटामध्ये आम्ही ‘‘एक हात मदतीचा’’ हा उपक्रम हाती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या मार्गदर्शनाखाली आता पुन्हा  एकदा मराठवाड्यातील पूरग्रस्तांची दिवाळी गोड करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. आम्ही पिंपरी-चिंचवडकर आणि मित्र परिवार सहकारी यांच्या योगदानातून भरीव मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या टप्प्यात जीवनाश्यक वस्तू, दुसऱ्या टप्प्यात गोधन दान आणि तिसऱ्या टप्प्यात शैक्षणिक मदत व सहकार्य देण्याचा संकल्प आहे.
महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
20.6 ° C
20.6 °
20.6 °
14 %
2.8kmh
0 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!