28.8 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
HomeTop Five Newsलाडकी बहीण योजनेत बनावट अर्जदारांनो सावधान...अन्यथा होणार कारवाई!

लाडकी बहीण योजनेत बनावट अर्जदारांनो सावधान…अन्यथा होणार कारवाई!

Ladaki bahin news – मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाच, काही ठिकाणी बनावट लाभार्थ्यांची प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत.(Maharashtra) महिला सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना केवळ गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी आहे. मात्र, चुकीची माहिती देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता सरकारने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, अर्जदार महिला किंवा त्यांच्या पतीचा इनकम टॅक्स डेटा आता थेट तपासला जाणार आहे. ज्या महिलांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी खोटी माहिती देऊन अर्ज केला असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यामुळे लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्यांना ‘नो एंट्री’ मिळणार आहे.

कोण पात्र?

  • २१ ते ६० वयोगटातील महिला
  • महाराष्ट्रातील रहिवासी
  • ठराविक उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असणे
  • कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत नसावा
  • कोणताही सदस्य इनकम टॅक्स भरत नसावा
  • विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा एकल आई असावी

कोण पात्र नाही?

  • जास्त जमीनधारक किंवा उच्च उत्पन्न गटातील कुटुंब
  • महिला किंवा पती इनकम टॅक्स भरणारे
  • शासकीय/निमशासकीय/सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी
  • खोटी माहिती देऊन अर्ज करणारे

सरकारने डिजिटल पडताळणीसाठी इनकम टॅक्स विभागाच्या डेटाशी लिंक केले आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा होते. यामुळे बनावट लाभार्थ्यांना रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जेणेकरून खरी गरजू महिला आणि कुटुंबांपर्यंतच लाभ पोहोचेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
28.8 ° C
28.8 °
28.8 °
35 %
4.4kmh
0 %
Thu
29 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!