22.1 C
New Delhi
Friday, April 3, 2026
HomeTop Five News३५० व्या शहीदी समागमासाठी शहरातून जाणाऱ्या भाविकांना आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी महापालिका...

३५० व्या शहीदी समागमासाठी शहरातून जाणाऱ्या भाविकांना आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी महापालिका कटिबद्ध – महापौर रवि लांडगे

पिंपरी, –  मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमामध्ये पिंपरी चिंचवड शहरातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुरु तेग बहादूर साहिब जी यांनी दिलेल्या त्याग आणि समर्पणाच्या प्रेरणादायी वारशाला अभिवादन करण्यासाठी सहभागी होणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार यासाठी महापालिका कटिबद्ध आहे, असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात समन्वय बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, ममता शिंदे, संदीप खोत, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, राजू कांबळे, कार्यकारी अभियंता दिवेकर के. बी, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पिंपरी येथील अखिल भारतीय वाल्मिकी आश्रमचे पदाधिकारी  सुनिल चटोले, मोहन बिलडान, नरेंद्र टाक, पिंपरी येथील गुरूद्वारा प्रबंधक गुरूमलसिंह, सुरिंदर सिंह नडीवाल, गुरूविंदरसिंह गिल, गोबिंदसिंह धावडा, एम. टी. भोरे तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

समागमासाठी शहरातून जाणाऱ्या भाविकांच्या प्रवासाच्या अनुषंगाने महापालिकेच्या संबंधित विभागांमार्फत वाहतूक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय मदत तसेच आवश्यक ती समन्वयात्मक उपाययोजना उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. भाविकांच्या प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती महापौर रवि लांडगे यांनी यावेळी दिली.

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहरातील शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, महोयाल, वाल्मिकी, उदासीन तसेच भागवत संप्रदायासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या कार्य व बलिदानाच्या इतिहासाला उजाळा देणार आहेत.

या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत समागमाच्या आयोजनाची रूपरेषा, विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन, तसेच आवश्यक प्रशासकीय समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध सामाजिक संघटना, धार्मिक संस्था व समाज प्रतिनिधी यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी पिंपरी चिंचवडमधील गुरूद्वारा प्रबंधन यांनी शहरातील भाविक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या प्रवासासाठी केलेल्या नियोजनाबाबत, बसेसच्या संख्येबाबत सविस्तर माहिती दिली तसेच या प्राथमिक नियोजनामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

याशिवाय, शहरातील विविध भागांमधून समागमासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या प्रवासासाठी सुयोग्य नियोजन करून समन्वय ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या निमित्ताने शाळांमध्ये वत्कृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या बलिदानाची प्रेरणा रुजेल, अशी सूचना आली. समागमासाठी शहरातून जाणाऱ्या नागरिकांसाठी महापालिका स्तरावर आवश्यक सोयीसुविधांची पूर्तता करावी, कार्यक्रमाची संपूर्ण शहरभर प्रभावी प्रचार प्रसिद्धी करावी तसेच जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी होण्यासाठी आवाहन करावे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. विशेषतः सिख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहियाल, वाल्मिकी, उदासीन आणि भगत नामदेव परंपरा समाजाची लोकसंख्या ज्या भागांमध्ये अधिक आहे, त्या भागांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. याशिवाय, या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याबाबतही सूचना यावेळी त्यांनी मांडल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
22.1 ° C
22.1 °
22.1 °
83 %
1kmh
75 %
Fri
26 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
34 °
Tue
35 °

Most Popular

Recent Comments