14.1 C
New Delhi
Tuesday, February 10, 2026
HomeTop Five Newsचार वर्षांनंतर पीसीएमसी सभागृह पुन्हा कार्यरत!

चार वर्षांनंतर पीसीएमसी सभागृह पुन्हा कार्यरत!

रवि लांडगे महापौर, शर्मिला बाबर उपमहापौर बिनविरोध

POLITICAL NEWS | पिंपरी- सुमारे चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे (PCMC) सभागृह अखेर कार्यान्वित झाले असून, आज झालेल्या पहिल्याच बैठकीत भारतीय जनता पार्टीचे रवि बाबासाहेब लांडगे यांची महापौरपदी, तर शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वैशाली काळभोर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली.

या निवडीनंतर आमदार महेश लांडगे यांनी लांडगे आणि बाबर कुटुंबियांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते, शहराचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत कै. बाबासाहेब लांडगे तसेच भाजपाचे नेते दिवंगत कै. अंकुशराव लांडगे यांनी पक्ष आणि शहरासाठी समर्पित भावनेतून कार्य केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्याला आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी निष्ठा राखून कार्य करणाऱ्या बाबर कुटुंबातील सौ. शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड होणे ही भारतीय जनता पार्टीतील कार्यसंस्कृतीचे उदाहरण असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाला अद्याप १२ दिवसही पूर्ण न झाल्याने, भाजपाने राजकीय संवेदनशीलता जपत कोणताही जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात फटाके, ढोल-ताशे किंवा जल्लोष टाळण्याचे आवाहन पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवकांना करण्यात आले आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत पुष्पगुच्छाऐवजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रतीक असलेली भारतीय संविधानाची प्रत देऊन करण्यात आले.

चार वर्षांनंतर लोकप्रतिनिधींचे सभागृह पुन्हा सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत आमदार महेश लांडगे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहराच्या “शाश्वत विकासासाठी” सर्वजण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.या बैठकीस भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
14.1 ° C
14.1 °
14.1 °
72 %
1kmh
3 %
Tue
27 °
Wed
27 °
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments