23.1 C
New Delhi
Sunday, March 29, 2026
HomeTop Five Newsपुणे महापालिकेतील महापौर-उपमहापौर निवड 9 फेब्रुवारीला

पुणे महापालिकेतील महापौर-उपमहापौर निवड 9 फेब्रुवारीला

जल्लोष टाळण्याचा भाजपाचा निर्णय**

PUNE POLITCAL | पुणे : पुणे महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदाची निवड येत्या 9 फेब्रुवारी रोजी होणार असून, महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने ही निवड प्रक्रिया केवळ औपचारिक स्वरूपाची ठरणार आहे. महापालिकेच्या एकूण 165 नगरसेवकांपैकी 119 नगरसेवक भाजपचे निवडून आल्याने, महापौर आणि उपमहापौरपदावर भाजपाचे उमेदवार निवडून येणे निश्चित मानले जात आहे.

या निवड प्रक्रियेबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने थेट हस्तक्षेप करत एका ओळीचा प्रस्ताव पाठवून महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी दिली. वरिष्ठ नेतृत्वाच्या या निर्णयामुळे निवड प्रक्रिया अधिक सुकर आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपाने संवेदनशीलता जपत महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला आहे. गुलाल उधळणे, फुले उधळणे, फटाके फोडणे अथवा अन्य कोणत्याही स्वरूपाचा आनंदोत्सव करण्यास भाजपच्या सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट मनाई करण्यात आली आहे.

महापौर आणि उपमहापौर निवडीची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत साध्या आणि शांत वातावरणात पार पाडली जाणार असून, कोणतेही सार्वजनिक शक्तीप्रदर्शन अथवा उत्सव टाळण्यात येणार आहे. निवडणूक ही प्रशासकीय प्रक्रिया म्हणून पार पडेल, असा स्पष्ट संदेश भाजप नेतृत्वाने दिला आहे.

भाजपकडे महापालिकेत प्रचंड बहुमत असले तरी, सध्याच्या शोकाकुल वातावरणाचा आदर राखत पक्षाने संयमाची भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात या निर्णयाची चर्चा होत आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडीत महापौर आणि उपमहापौर कोण ठरणार, याकडे लक्ष असले तरी, या निवडीचा सूर मात्र अत्यंत शांत आणि संवेदनशील राहणार असल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
56 %
2.6kmh
96 %
Sun
35 °
Mon
34 °
Tue
35 °
Wed
36 °
Thu
35 °

Most Popular

Recent Comments