22.1 C
New Delhi
Sunday, January 18, 2026
HomeTop Five Newsस्व:बळाचा नारा-भाजप अन् राष्ट्रवादी आमनेसामने

स्व:बळाचा नारा-भाजप अन् राष्ट्रवादी आमनेसामने

भाजप अन् राष्ट्रवादी आमने सामने

MUNICIPAL ELECTION | राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या रणनीतीवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारच्या कामगिरीमुळे मुंबईसह सर्वच महापालिकांमध्ये जनतेचा कौल महायुतीलाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाचे म्हणजे, राज्यात बहुतांश ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भाजपसोबत घट्ट हात असणार आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकत्र लढता येणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप हे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यावर अजितदादांशी चर्चा झाली आहे. जर आम्ही एकत्र लढलो तर त्याचा फायदा विरोधकांना होईल, हे आम्हा दोघांनाही समजते. त्यामुळे ही मैत्रीपूर्ण लढत असेल, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्व पक्षांनी तयारीला वेग दिला आहे.

फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची शिवसेना राज्यात भाजपसोबत असेल. बहुतांश महापालिकांमध्ये आम्ही एकत्र लढू. यामुळे मुंबई, ठाणे, नाशिक आदी ठिकाणी महायुती एकसंध दिसेल. तसेच मतदारयाद्यांमध्ये थोडाफार घोळ असतो, तो आम्हीही दाखवला आहे. पण त्यामुळे निवडणुका घ्यायच्याच नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे. येत्या काळात एसआयआर प्रक्रियेमुळे घोळ कमी होईल. निवडणूक आयोगाने याद्या ब्लॉकचेनवर टाकाव्यात, म्हणजे घोळ पूर्ण संपेल, असंही फडणवीस यांनी म्हटले.

महापालिका निवडणुकांच्या महत्वाच्या तारखा –

-नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी, 23 ते 30 डिसेंबर 2025
-छाननी – 31 डिसेंबर 2025,
-उमेदवारी माघारीची मुदत – 2 जानेवारी 2026
-निवडणूक चिन्हा वाटप व अंतिम उमेदवाराची यादी 3 जानेवारी 2026
-मदतानाचा दिनांक 15 जानेवारी 2026
-मतमोजणी दिनांक – 16 जानेवारी 2026

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
22.1 ° C
22.1 °
22.1 °
49 %
3.6kmh
0 %
Sun
24 °
Mon
24 °
Tue
24 °
Wed
24 °
Thu
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!