26.1 C
New Delhi
Thursday, April 2, 2026
HomeTop Five Newsभारतीय कला प्रसारणी न्यासाच्या वतीने-प्रकाश गुंफेकर यांचा अभिनव जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

भारतीय कला प्रसारणी न्यासाच्या वतीने-प्रकाश गुंफेकर यांचा अभिनव जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

चंचल मनाला स्थिर ठेवण्याची ताकद कलेत : पुष्कराज पाठक

पुणे : कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रकाश गुंफेकर यांचा भारतीय कला प्रसारिणी न्सभा यासाच्या वतीने आज (दि. २) अभिनव जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण भारतीय कलाप्रसारिणी सभा न्यासाचे सचिव पुष्कराज  भालचंद्र पाठक यांच्या हस्ते झाले.

अभिनव कला महाविद्यालयातर्फे सावित्रीबाई फुले स्मारक येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ‘अभिनव कला व्यूह २०२६’ प्रदर्शन आणि संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रा. प्रकाश गुंफेकर यांना गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

न्यासाचे दिवंगत सचिव बी. एम. पाठक यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने कला क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्राचार्य विलास चोरमले, संजय भारती, माजी प्राचार्य राहुल बळवंत, संमेलन प्रमुख अर्पिता कोल्हटकर, सतिश काळे, प्रा. गाडेकर, प्रा. बोरावके उपस्थित होते. सुरुवातीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

अभिवन कला महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत जीवन गौरव पुरस्कार नम्रपणे स्वीकारत असल्याचे प्रा. प्रकाश गुंफेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

प्रकाश गुंफेकर यांच्या कार्याचा पुष्कराज पाठक यांनी गौरव केला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुष्कराज पाठक म्हणाले, निरक्षरांना देखील वाचता येते अशी भाषा कला आहे. चंचल मनाला स्थिर ठेवण्याची ताकद कलेत असते. आपण सर्वजण कलेचे उपासक आहात. कलेचा आनंद घेताना इतरांनाही आपल्या कलेत सामवून घेतल्यास त्याचे समाजातील स्थान वेगळे असते.

अभिनव कला महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक कलाकार उदयाला आले असल्याचे प्राचार्य विलास चोरमले यांनी गौरवाने नमूद केले. तर अभिनव महाविद्यालय एक कुटुंब असल्याचे सांगून संजय भारती म्हणाले, महाविद्यालयाचा वारसा प्रत्येक विद्यार्थ्यांने जपावा.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता देशपांडे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
26.1 ° C
26.1 °
26.1 °
50 %
2.6kmh
40 %
Wed
26 °
Thu
36 °
Fri
35 °
Sat
31 °
Sun
34 °

Most Popular

Recent Comments