34.8 C
New Delhi
Sunday, July 13, 2025
HomeTop Five Newsटोकन दर्शन प्रणालीची दि.15 जून रोजी प्रथम चाचणी

टोकन दर्शन प्रणालीची दि.15 जून रोजी प्रथम चाचणी

मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने दि.14 जून पासून करता येईल बुकिंग

भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न,

पंढरपूर :- मंदिर समितीच्या दि. 07 जून रोजीच्या सभेत टोकन दर्शन प्रणालीची दि. 15 जून रोजी प्रथम चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने प्रथम चाचणी दिवशी सुमारे 1200 टोकन उपलब्ध होणार असून, त्याचे बुकींग भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून दि.14 जून पासून उपलब्ध होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, बेंगलोर यांच्याकडून सेवाभावी तत्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित करून घेण्यात आली आहे. दरवर्षी वारकरी भाविकांची वाढती संख्या पाहता, भविष्यात दर्शन रांग आणि भाविकांच्या सोयींचे योग्य व्यवस्थापनावर काम करणे अत्यावश्यक आहे. या प्रणालीद्वारे भाविकांना आधीच दर्शनाची वेळ निश्चित करून दर्शनासाठी रांगेत न थांबता, ठरावित वेळेत दर्शनहॉलच्या माध्यमातून मंदिरात प्रवेश करता येणार आहे, ही प्रणाली विशेषत: गर्दीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांचा वेळ व श्रम वाचण्यास मदत होण्यास प्रभावी ठरेल.

टोकन दर्शन प्रणालीच्या प्रथम चाचणीचे टोकन दि. 14 जून रोजी सकाळी 10.00 पासून www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून बुकींग करता येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने तयार झालेले टोकन प्रिंट करून, निश्चित करून दिलेल्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पंढरपूरच्या उत्तरेकडील मागीस बाजूस प्रवेश करून टोकनची पडताळणी करून घेणे व तद्नंतर दर्शनहॉलमध्ये प्रवेश दिला जाईल व वेळेनुसार थेट दर्शन रांगेत प्रवेश होऊन भाविकांचे सुलभ दर्शन होणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.

टोकन दर्शन प्रणालीची प्रथम चाचणी घेण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथील दुस-या व तिस-या माळ्यावर प्रतिक्षा हॉल तयार केले असून, त्याठिकाणी बैठक व्यवस्था, प्रसाधन गृह, पिण्याचे पाणी, चहा, सार्वजनिक सुचना प्रसारण प्रणाली, सुरक्षा रक्षक, दिशादर्शक व आपत्कालिन मार्ग फलक, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी अनुषंगीक व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रथम चाचणीचा शुभारंभ मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते व सर्व सदस्य महोदयांच्या उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे दि. 15 जून रोजी सकाळी 10.00 वाजता होणार असल्याचे यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
34.8 ° C
34.8 °
34.8 °
47 %
3.1kmh
85 %
Sun
35 °
Mon
39 °
Tue
35 °
Wed
37 °
Thu
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!