16.1 C
New Delhi
Thursday, December 11, 2025
HomeTop Five Newsश्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात जमा होणा-या निर्माल्यापासून अगरबत्तीची निर्मिती-व्यवस्थापक श्रोत्री

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात जमा होणा-या निर्माल्यापासून अगरबत्तीची निर्मिती-व्यवस्थापक श्रोत्री


पंढरपूर :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात जमा होणा-या निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. या अनुषंगाने निर्माल्या पासून तयार केलेली अगरबत्ती भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

त्याचा शुभारंभ आज दिनांक 15 जून रोजी सकाळी 11.00 वाजता श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते व सदस्य महोदय यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतलाताई नडगिरे, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड. माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत उपस्थित होते.

या निर्मल्या पासून निशिगंध, केशर चंदन, सोनचाफा, समर्थ इत्यादी चार प्रकारच्या अगरबत्ती तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याची प्रति नग 50 रुपये किंमत आहे. भाविकांना श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथील स्टॉल वरून अगरबत्ती उपलब्ध करून घेता येईल. या कामी श्री ॠषिकेश भट्टड, प्रभव आरोमॅटिक्स, पंढरपूर यांचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता. त्यांचेकडून श्रींच्या निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, भाविकांना चांगल्या दर्जाची अगरबत्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मंदिरात येणारे भाविक भक्तीभावाने श्रींस तुळशी, हार व फुले अर्पण करीत असतात. अर्पण केलेल्या हार-फुलांपासून धुप व अगरबत्ती तयार करून भाविकांना उपलब्ध करून देऊन निर्माल्याचे पवित्र जपण्याचा मंदिर समितीने प्रयत्न केला असल्याचे यावेळी व्यवस्थापक श्री श्रोत्री यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
16.1 ° C
16.1 °
16.1 °
63 %
0kmh
0 %
Thu
20 °
Fri
25 °
Sat
25 °
Sun
25 °
Mon
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!